Sign In New user? Start here.

अतुल कुलकर्णी

 

 
 
 

अतुल कुलकर्णी

अभिनेता | दिग्दर्शक

जन्मतारीख :- १० सप्टेंबर १९६५

परिचय-अतुल कुलकर्णी अतिशय दर्जेदार अभिनय करणारा आणि दर्जेदार भूमिका निवडणारा आणि या भूमिकांना पुरेपूर न्याय देणार अभिनेता म्हणून मराठी/हिंदी चित्रपटसॄष्टीत प्रसिद्ध आहे. अतुलने आत्तापर्यंत केलेल्ल्या सर्वच भूमिका अतिशय वेगळ्या आहेत. मग ती भूमिका चित्रपटातील असो की, नाटकातील...अनेक मोठ मोठ्या स्टारसोबत त्याने काम केलं आहे. मात्र आपण कुठेही कमी असल्याचं त्याच्या चेह-यावर कधी दिसून आलं नाही. अतिशय आत्मविश्वासाने त्याने त्याचं प्रत्येक काम केलंय. मुळात रंगभूमीचा कलाकार असलेल्या अतुलने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्ये अल्पावधीतच आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

बेळगाव या कर्नाटकातल्या गावातून अतुलचा परिवार सोलापूरला स्थायिक झाला. लहान पणापासूनच अतुलला अभिनयाची आवड होती. शाळेत असतांना त्याने पहिल्यांदा नाटकात काम केलं होतं. त्याच्या घरच्यांनी त्याला बेळगाव येथे १२ वीत टाकलं. मात्र तो १२ वीत दोनदा परिक्षा दिल्यानंतर पास झाला. त्यानंतर त्याने पुढील इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी पुणे गाठले. मात्र तेही त्याला पूर्ण करता आलं नाही. शेवटी त्याने सोलापूरातून कला शाखेची पदवी घेतली. कॉलेज मध्ये असताना त्याने अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये भाग घेणं सुरू केलं. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नेमकं त्याला काय करायचं आहे. आणि मग त्याने त्याच्यातील कलेचा विकास करण्यासाठी सोलापूरातील ‘नाट्य आराधना’ ही संस्था जॉईन केली. अनेक वर्ष त्याने या संस्थेत पडद्याच्यामागे राहून काम केलं. आणि त्यानंतर त्याने दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. १९९५ साली अतुल एनएसडीतून अभिनयाचं शिक्षण घेऊन बाहेर पडला तेव्हा त्याचं ३० वर्ष इतकं होतं. १९९५ पासून अतुलने चार भाषांतील आठ नाटकांमध्ये काम केलं असून सहा भाषांतील २६ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आणि त्याला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे.

 
 

नाटक

समुद्र

 

माणूस नावाचं बेट

 

आपण सारेच गोडेगांवकर

 

चाफा

 

नाटक

 

क्रॉस रोड

 

मरीचक्कटिकम

 
 

पुरस्कार

राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता

(हे राम)(१९९९)

राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता

(चांदणी बार) (२००२)

आदित्य बिरला फांऊडेशन अवॉर्ड

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

 

नानासाहेब फाटक पुरस्कार

 

स्क्रिन व्हिडीओकॉन सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

(दहावी फ)

मटा सन्मान पुरस्कार

(भेट)

अल्फा गौरव पुरस्कार

(भेट)

महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता

(भेट)

 

चित्रपट

पोपट

प्रेमाची गोष्ट

चालीस चौरसिया (हिंदी)

सिंग्युलॅरीटी

 

रंग दे बसंती

 

पेज ३

 

खाकी

 

रन

 

सत्ता

 

८८ अ‍ॅंटॉप हिल

 

दम

 

चांदणी बार

 

कैरी

 

हे राम

 

दिल्ली ६

 

कच्चा लिंबू

 

अल्लाह के बंदे

 

हे राम

 

कुरूक्षेत्र

 

गौरी

 

देवराई

 

चकवा

 

मानसरोवर

 

दहावी फ

 

वास्तु पुरूष

 

भेट

 

वळू

 

सुखांत

 

नटरंग

 

यक्ष

 

बम बम बोले

 

ये मेरा इंडिया

 

वंदे मातरम

(तामीळ)

 
 

फोटो

 

व्हिडीओ