Sign In New user? Start here.

भूषण प्रधान

 

 
 
 


भूषण प्रधान

अभिनेता |

जन्मतारीख - २५ नोव्हेंबर

परिचय-

वयाच्या ८ व्या वर्षी भूषणने त्याच्या अभिनयाची सुरवात 'वाढदिवसाची भेट' या नाटकाने केली. त्याचबरोबर राहुल सोलापूरकरांच्या एका माहितीपटातही काम केलं होतं. त्यानंतर अनेक आंतरशालेय, पुरुषोत्तम, फिरोदियासारख्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांतून नाटकांत कामं केली. सिंबायोसिस कॉलेजमध्ये असल्याने हिंदी नाटकांतही कामं केली. यातूनच पुढे वेगवेगळ्या मालिकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचा ह्या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. अभिनय क्षेत्रातच काहीतरी करायचं ह्यावर तो ठाम होताच. पण या क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे एखादी डिग्री मिळवायची हे त्याच्या मनात होतं. याच विचारातून ग्रॅज्युएशननंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. कला क्षेत्रात काम करत असताना त्यासाठी आवश्यक त्या मेहनतीची, कलासाधनेसाठी द्याव्या लागणा-या वेळेची कल्पना असल्यानेच त्याने ग्रॅज्युएशन साठीही वाणिज्य शाखेची निवड केली. व यासाठी त्याला त्याच्या घरच्यांकडूनही कायम पाठींबा मिळाला. आज तो मराठी मनोरंजन क्षेत्रातील यशस्वी अभिनेता आहे.

 

मालिका

पिंजरा

 

खल्लास- डान्स एकच चान्स(सूत्रसंचालन)

 

ओळख

 

वारस

 

कुंकू

 

चार चौघी

 

घे भरारी

 
 

नाटक

बिटविन द लाईन

 

दोन भागिले शून्य

 

व-हाड निघालंय लंडनला

 

बायकोचा घोटाळा

 
 

चित्रपट

मी आणि यू

 

कलाकार

 

पारंबी

 

सतरंगी रे

 

पुरस्कार

सर्वोत्कॄष्ट अभिनेता (पिंजरा)

 

सर्वोत्कॄष्ट लोकप्रिय जोडी(पिंजरा)

 
 
 
 

फोटो

 

व्हिडीओ