Sign In New user? Start here.

चिन्मय मांडलेकर

 


 
 
 

चिन्मय मांडलेकर

अभिनेता | लेखक

जन्मतारीख - २ फेब्रुवारी

परिचय-

   मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख असलेल्या कलाकारांमध्ये चिन्मय मांडलेकर अभिनेता आहे. ज्याच्याकडे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून प्रेक्षक बघतात. त्याची एक खासियत म्हणजे तो फक्त अभिनयच करत नाहीतर एक चांगला लेखक सुद्धा आहे. त्याने अनेक प्रसिद्ध मालिकांसाठी लिखाण केले आहे.

   चिन्मयच्या कलाक्षेत्रातील प्रवासाची सुरवात झाली ती विले पार्ल्याच्या एम. एल. डहाणूकर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर... अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमार्फत त्याच्या अभिनय कौशल्याला योग्य ती संधीच मिळाली. कॉलेज शिक्षण झाल्यावर चिन्मयने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एन एस डी) मध्ये प्रवेश घेतला. NSD चा पदवीधर म्हणून मराठी दूरदर्शन क्षेत्रात त्याचे स्वागत झाले आणि 'वादळवाट' या दूरदर्शनवरील मराठी मालिकेत काम करत असताना त्याने एक छंद म्हणून मधल्या काळात एक स्क्रिप्ट लिहिले आणि 'क्षण' या चित्रपटाच्या निमित्ताने सन २००६ ला चिन्मय एक चित्रपट कथा लेखक म्हणून समोर आला. मात्र त्याला लेखक म्हणून खरी प्रसिद्धी मिळाली ती 'असंभव' या मालिकेद्वारे. चिन्मयला लेखनाची गोडी 'वादळवाट' करत असतानापासूनच निर्माण झाली व एक सह लेखक म्हणून त्याने काम केले होते. आज तो लेखनासोबतच अनेक मालिका, मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करतो आहे.

 

मालिका

तू तिथे मी

 

गुंतता हृदय हे(लेखन)

 

अनहोनी(कथा)

 

वादळवाट

 
 

नाटक

सुखाशी भांडतो आम्ही

 

एक अफडा विसरता न येणारा

 

आदिपश्य(दिग्दर्शन)

 
 

चित्रपट

विजय असो

२०१३

ऎक

२०१२

शांघाई

२०१२

चिरगुट

२०१२

मोरया

२०११

झेंडा

 

गजर

२०११

पांगिरा

२०११

तेरे बिन लादेन

२०१०

क्रांतिवीर राजगुरू

२०१०