Sign In New user? Start here.

नाना पाटेकर

 

 
 

 

नाना पाटेकर

अभिनेता |

१ जानेवारी १९५१

परिचय-

नाना पाटेकर मराठी रंगभूमी हिंदी/मराठी चित्रपटसृष्टीतील एक आगळवेगळं व्यक्तीमत्व असणारे अभिनेते. रंगभूमीवर अनेक ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवलेल्या नानांनी स्वत:ची अभिनय क्षमता सिद्ध करण्यास कुठलीही कसर सोडलेली नाहीये. त्यामुळे आज हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव मानानं घेतल्या जातं. नानांनी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाला सुरवात केली. मात्र त्यांनी काही वर्षांनी नाटकांकडे पाठ फिरवली. आणि ते चित्रपटात अभिनय करू लागले. अनेक गाजलेल्या जुन्या चित्रपटात त्यांनी दर्जेदार भूमिका केल्या आहेत ज्या आजही प्रेक्षकांना तशाच्या तशाच आठवतात. त्यांनी अनेक चित्रपटात रंगवलेला अभिनेताही तेवढाच लोकप्रिय आहे आणि अनेक चित्रपटात रंगवलेला चरित्र अभिनेता सुद्धा तेवढाच लोकप्रिय आहे हे विशेष. त्यांन १९८९ साली आलेल्या ‘परिंदा’या चित्रपटातील रोलसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आणि अनेक चित्रपटातील चरित्र अभिनेत्यासाठी सुद्धा त्यांन अनेक पुरस्कार मिळाले आहे. परिंदानंतर त्यांचा सर्वात जास्त गाजलेला सुपरडुपर हिट चित्रपट म्हणजे ‘क्रांतिविर’साठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

चित्रपटांमध्ये प्रसिद्धी मिळत असतांनाच नानांनी पहिल्यांदाच ‘प्रहार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि क्रिटीकली या चित्रपटाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. नाना पाटेकर यांनी आजपर्यंत केलेल्या सर्वच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. या भूमिकांपैकी ‘क्रांतिविर’, ‘तिरंगा’, ‘खामोशी’, ‘प्रहार’, ‘अब तक छप्पन’ या चित्रपटातील भूमिका अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. आज नाना वेगवेगळ्या भूमिका करण्य़ासाठी प्रसिद्ध आहे. नानांना अभिनया व्यतिरीक्त सामाजिक कार्यात सुद्धा अधिक रस आहे. ते बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ आश्रमात जाऊन डॉ.प्रकाश आमटे यांची मदत करतात.

 

पुरस्कार

सर्वोत्कॄष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार

क्रांतिविर(१९९५)

सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार

परिंदा(१९९०)

सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार

अग्निशिखा(१९९७)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट अभिनेता पुरस्कार

क्रांतिविर(१९९५)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता पुरस्कार नामांकन

अंध युद्ध(१९८९)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता पुरस्कार

परिंदा(१९९०)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता पुरस्कार नामांकन

राजू बन गया जंटलमेन(१९९३)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता पुरस्कार नामांक

तिरंगा(१९९४)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता पुरस्कार नामांकन

राजनिती(२०११)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट चरित्र अभिनेता पुरस्कार

अंगार(१९९२)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट चरित्र अभिनेता पुरस्कार नामांकन

शक्ती(२००३)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट चरित्र अभिनेता पुरस्कार

अपहरण(२००८)

फिल्मफेअर सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेता पुरस्कार नामांकन

राजनिती(२०११)

स्टार स्क्रिन सर्वोत्कृष्ट अभिनेता

क्रांतिविर(१९९५)

स्टार स्क्रिन सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेता

अपहरण(२००६)

बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन अवॉर्ड

अब तक छप्पन(२००४)

 

चित्रपट

प्रहार (दिग्दर्शन)

१९९१

गमन

१९७८

आज की आवाज

१९८४

अंकुश

१९८६

लॉर्ड माऊंट बॅटन

१९८६

माफिचा साक्षीदार

१९८६

सूत्रधार

१९८७

अंध युद्ध

१९८७

प्रतिघात

१९८७

त्रिशग्नी

१९८८

सलाम बॉम्बे

१९८८

परींदा

१९९०

थोडासा रूमाणी हो जाये

१९९०

प्रहार

१९९१

दिशा

१९९१

तिरंगा

१९९२

राजू बन गया जंटलमेन

१९९२

अंगार

१९९२

क्रांतिविर

१९९४

हम दोनो

१९९५

अग्नी साक्षी

१९९६

खामोशी

१९९६

गुला-ए-मुस्तफा

१९९७

यशवंत

१९९७

युगपुरूष

१९९८

वजूद

१९९८

हू तू तू

१९९९

कोहराम

१९९९

गॅंग

२०००

तरकीब

२०००

वध

२००२

शक्ती

२००२

भूत

२००३

डरना मना है

२००३

ऑंच

२००३

अब तक छप्पन

२००४

अपहरण

२००५

पक पक पकाक

 

२००५

 

ब्लफ मास्टर

२००५

टॅक्सी नं. ९२११

२००६

दस कहानिया

२००७

वेलकम

२००७

यात्रा

२००७

सामना

२००६

द पूल

२००७

एक

२००८

हॉर्न ओके प्लिज

२००९

बोम्मलट्टम

२००८

पाठशाला(

२०१०

राजनिती

२०१०

तुम मिलो तो सही

२०१०

शागीर्द

२०११

इट्स माय लाईफ

२०११

देऊळ

२०११

 
 

फोटो

 

व्हिडीओ