Sign In New user? Start here.

सचीन पिळगांवकर

 

 
 

 

सचीन पिळगांवकर

अभिनेता |

जन्मतारीख - १७ ऑगस्ट १९५७

परिचय-

सचीन पिळगांवकर यांनी त्यांच्या अभिनयाच्या करीअरची सुरवात केली ती बालकलाकार म्हणून. ‘हा माझा मार्ग एकला’ या १९६२ साली आलेल्या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला तेव्हा ते चार वर्षाचे होते. आणि याच चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. आणि हा पुरस्कार त्यांना तेव्हाचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. त्यांनी तेव्हा ‘ज्वेल थिफ’, ‘ब्रम्हचारी’, आणि ‘मेला’ या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. त्यांनी बालकलाकार म्हणून ज्युनिअर मेहमुद यांच्याबरोबर १५ चित्रपट केले आहे. त्यावेळी त्यांची जोडी चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

सचीन यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट आहे तो राजश्री प्रॉडक्शनचा ‘गीत गाता चल’ हा गाजलेला चित्रपट. या चित्रपटात त्यांच्यासोबत सारिका या अभिनेत्रीने काम केले होते. आणि या चित्रपटाला अतिशय जोरदार यश मिळाले. त्यानंतर या दोघांच्या जोडीचे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यानंतर प्रेक्षकांना आजही आजही लक्षात असलेल्या शोले, त्रिशुल आणि सत्ते पे सत्ता या चित्रपटातही सहायक अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यानंतर मात्र त्यांनी मराठी चित्रपट दिग्दर्शनाकडे आणि निर्मितीकडे लक्ष केंद्रीत केले. आजही इतक्या वर्षांनंतर मराठी चित्रपटसॄष्टीतील अनेक दिग्गज दिग्दर्शकांमध्ये सचीन पिळगांवकर यांचं नाव घेतलं जातं.

मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी ९० दशकात ‘तू तू मै मै’ या सुपरहिट मालिकेचे दिग्दर्शन केले. ज्यात त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया आणि रिमा लागू यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर त्यांनी ‘हद कर दी’ ही मालिका केली. त्यानंतर त्यांने आपला मोर्चा वळवला तो सूत्रसंचालनाकडे. त्यांनी ‘चलती का नाम अंताक्षरी’ या कार्यक्रमाचे आणि अनेक पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. २००६ साली सचीन आणि सुप्रिया ही जोडी ‘नच बलिये’ या हिंदी रिअ‍ॅलिटी शोची विजेती जोडी ठरली. त्यानंतर झी मराठी या आघाडीच्या वाहिनीवर नृत्यावर आधारीत ‘एकापेक्षा एक’ हा रिअ‍ॅलिटी शो सुरु केला. त्यानंतर सचीन यांनी रिअ‍ॅलिटी शोची परिक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली आहे.

 
 

नाटक

तू तू मैं मैं

 

एका पेक्षा एक

 
 

पुरस्कार

‘आम्ही असू लाडके’ मराठी चित्रपट -सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा झी गौरव पुरस्कार (२००६)

 
 

चित्रपट

एकुलती एक

२०१३

शर्यत

२०११

आयडियाची कल्पना

२०१०

आम्ही सातपुते

२००८

ही पोरगी कुणाची

२००६

नवरा माझा नवसाचा

२००४

ऎसी भी क्या जल्दी है

१९९६

आयत्या घरात घरोबा

१९९१

आमच्यासारखेच आम्ही

१९९०

एकापेक्षा एक

१९९०

अभी तो मैन जवान हू

१९८९

आत्मविश्वास

१९८९

भूताचा भाऊ

१९८९

अशी ही बनवा बनवी

१९८८

माझा पती करोडपती

१९८८

गंमत जंमत

१९८७

नवरी मिळे नव-याला

१९८४

सत्ते पे सत्ता

१९८२

नदिया के पार

१९८२

अष्टविनायक

१९७९

गोपाल कृष्णा

१९७९

कॉलेज गर्ल

१९७८

अखियों के झरोकोंसे

१९७८

गीत गाता चल

१९७५

बालिका वधू

१९७६

शोले

१९७५

ब्रम्हचारी

१९६८

हा माझा मार्ग एकला

१९६२

आयडियाची कल्पना

२०१०

एकदंत(कन्नड)

२००७

आम्ही सातपुते

२००८

नवरा माझा नवसाचा

२००४

कुंकू

१९९४

आयत्या घरात घरोबा

१९९१

एकापेक्षा एक

१९९०

आमच्यासारखे आम्हीच

१९९०

आत्मविश्वास

१९८९

>भूताचा भाऊ

१९८९

अशी ही बनवा बनवी

१९८८

माझा पती करोडपती

१९८८

गंमत जंमत

१९८७

नवरी मिळे नव-याला

१९८४

सव्वाशेर

१९८४

माय बाप

१९८२

त्रिशूल

 
 
 

फोटो

 

व्हिडीओ