Sign In New user? Start here.

संदीप कुलकर्णी

 

 
 

 

संदीप कुलकर्णी

अभिनेता |

जन्मतारीख - १६ नोव्हेंबर

परिचय-

परिचय-
मराठी चित्रपटसृष्टीतील काहीच असे कलाकार आहेत जे हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगळं स्थान निर्माण करून आहेत. त्यातील एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता संदीप कुलकर्णी. संदीपने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक बहुरंगी भूमिका केल्या आहेत. शिवाय त्यान अनेक मराठी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. सद्या झी मराठीवर त्याची ‘गुंतता हृदय हे’ ही मालिका चांगलीच गाजते आहे. त्यातीलच त्याला प्रसिद्ध देणारी भूमिका म्हणजे "डोंबिवली फास्ट" आणि "श्वास" या चित्रपटातील भूमिका...संदीपने अनेक मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. २०११ मध्ये त्याचा "निर्वाना १३" हा हिंदी चित्रपट येतोय.

संदीपने मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून ग्रॅज्युएशन केलं. अभिनयाचे बरेचसे धडे त्याला या कॉलेजमध्येच मिळाले. भारतातील काही प्रसिद्ध चित्रकारांमध्ये नाव घेतल्या जाणा-या प्रतिभावंत शिक्षकांच्या म्हणजेच प्रभाकर कोतले आणि अतुल दोडिया यांच्या हाताखाली त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संदीपची अभिनयाची ओढ वाढली ती प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्याशी भेट झाल्यानंतर...संदीपने ४ वर्ष मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर काम केलं त्यानंतर त्याने त्याच मोर्चा वळवला तो टेलिव्हिजनकडे...त्याने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या बहुरंगी भूमिका केल्या आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

संदीपच्या फिल्म करिअरची सुरवात झाली ती भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘मामू’(१९९४) या चित्रपटातून...

 
 

टीव्ही

गुंतता हॄदय हे

(झी मराठी)

 

पुरस्कार

‘आम्ही असू लाडके’ मराठी चित्रपट -सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा झी गौरव पुरस्कार (२००६)

 
 

चित्रपट

प्रेमसूत्र

२०१३

अजिंक्य

२०१३

मामू

१९९४

हजार चौरसी की मा

१९९८

शूल

१९९९

श्वास

२००४

डोंबिवली फास्ट

२००५

अधांतरी

२००५

माय बाप

२००६

राजकारण

२००७

एक डाव संसाराचा

२००८

बेधुंद

२००८

गैर

२००९

निर्वाना १३

२०११

मेड इन चायना

२००९

पुरस्कार

सर्वोत्कॄष्ट अभिनेता - नायजेरिअन फिल्म फेस्टिव्हल

(एक डाव संसाराचा) (२००८)

ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन

(श्वास)(२००४)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - राष्ट्रीय पुरस्कार

(श्वास)(२००४)

सर्वोत्कॄष्ट चित्रपट - राष्ट्रीय पुरस्कार

(डोंबिवली फास्ट)(२००५)

सर्वोत्कॄष्ट चित्रपट - राष्ट्रीय चित्रपट

(ट्रॅफिक सिग्नल)(२००७)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - राज्य चित्रपट पुरस्कार

(श्वास)(२००४)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - राज्य चित्रपट पुरस्कार

(डोंबिवली फास्ट)(२००५)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - राज्य चित्रपट पुरस्कार

(अधांतरी)(२००५)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - झी पुरस्कार

(श्वास)(२००४)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - झी पुरस्कार

(डोंबिवली फास्ट)(२००५)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - म.टा. सन्मान पुरस्कार

(डोंबिवली फास्ट)(२००५)

 
 

फोटो