Sign In New user? Start here.

सुनील बर्वे

 

 
 
 

सुनील बर्वेअभिनेता |

जन्मतारीख :- ३ ऑक्टोबर

परिचय-

   गेल्या २० वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे सुनील बर्वे. जो हिंदी मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. सुनीलने आत्तापर्यंत अनेक वेगळ्या विषयांच्या चित्रपट, नाटकात दर्जेदार अभिनय केला असून त्याने अभिनेता म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुनीलच्या अभिनयाची सुरवात झाली ती १९८५ साली आलेल्या ‘अफलातून’ या नाटकातून...त्यानंतर त्याने रंगभूमीवरील अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं त्यात विनय आपटे, विजय केंकरे, विक्रम गोखले, दिलीप कुलकर्णी, चंदु पारखी, किशोर भट, वंदना गुप्ते, मोहन जोशी, दामू केंकरे यांचा समावेश करता येईल. सुनीलला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी ‘आत्मविश्वास’ या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली आणि ही संधी त्याला दिली ती प्रसिद्ध दिग्दर्शक/अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी...त्यानंतर त्याचा पहिला हिंदी चित्रपट होता तो ‘तन्नू कि टिना’...

सुनीलने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकात काम केल्यानंतर ‘सुबक’ अंतर्गत ‘हर्बेरिअम’ उपक्रम सुरू केला. ज्या माध्यमातून त्याने अनेक जुनी गाजलेली नाटकं रंगभूमीवर परत एकदा आणली. सुनीलची एक आणखी खासियत म्हण्जे सुनीलने वर्ल्ड स्पेस रेडिओसाठी रेडिओ जॉकी म्हणून सुद्धा काम केलं आहे. सुनील फक्त अभिनयच करत नाहीतर तो उत्तम तबला सुद्धा वाजवतो आणि उत्तम गातो सुद्धा...एकंदर काय तर सुनील हा एक बहुरंगी व्यक्तीमत्व आहे.

 
 

नाटक

अफलातून

 

मोरूची मावशी

 

कशी मी राहू तशीच

 

वन रूम किचन

 

चार चौघी

 

म्हणून मी तुला कुठे नेत नाही

 

ह्यांना जमतं तरी कसं

 

असेच आम्ही सारे

 

हेलो इन्स्पेक्टर

 

श्री तशी सौ

 

हिच तर प्रेमाची गंमत आहे

 

मासिबा

 

ऑल द बेस्ट

 

मोरूची मावशी

 
 

मालिका

कुंकू

 

कळत न कळत

 

असंभव

 

अभी तो मैन जवान हु

 

अधांतरी

 

अवंती

 

अवंतिका

 

आवाज

 

बोलाची कढी

 

चाळ नावाची वाचाळ वस्ती

 

छैल छबीला

 

चतुराई

 

गोष्ट एका आनंदची

 

हे सारे संचीताचे

 

इमारत

 

जावई शोध

 

झोका

 

झुट्न जरीवाला

 

कर्तव्य

 

कौन अपना कौन पराया

 

कोई सुरत नजर नही आती

 

कोरा कागज

 

नायक

 

प्रपंच

 

प्रो. प्यारेलाल

 

रिमझीम

 

सप्तर्शी

 

श्रीयुत गंगाधर टिपरे

 

स्वयंम

 

थरार

 

त्रेधा तिरपिट

 

वाळवाचा पाऊस

 
 

चित्रपट

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

 

आत्मविश्वास

 

आहुती

 

लपंडाव

 

तन्नू कि टिना

 

निदान

 

अस्तित्व

 

पाश

 

आई

 

आनंदाचे झाड

 

गोजिरी

 

दिवसेंदिवस

 

सुगंध

 

तू तिथे मी

 

गोजिरी

 
 
     
 

फोटो

 

व्हिडीओ