Sign In New user? Start here.

स्वप्नील जोशी

 

 
 
 


स्वप्नील जोशी

अभिनेता |

जन्मतारीख - १८ ऑक्टोबर

परिचय-

मुंबईकर असलेल्या स्वप्नील जोशीने अभिनयाची सुरवात झाली ती रामानंद सागर यांच्या ऎतिहासिक ‘उत्तर रामायण’ मालिकेतील कुशच्या भूमिकेने आणि तेव्हा त्याचं वय होतं नऊ वर्षे. त्यानंतर रामानंद सागर यांनीच स्वप्नीलला त्यांच्या क्रिष्णा या मालिकेत कृष्णाची मुख्य भूमिका दिली. त्याने केलेली ही इतकी गाजली की आजही ती प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

स्वप्नीलने त्याचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा अभियाकडे वळला. तेव्हा त्याने केलेली पहिली मराठी मालिका होती ‘अधूरी एक कहाणी’. त्यानंतर हिंदी मालिकांच्या विश्वात स्वप्नील एक आघाडीचा नायक म्हणून नावारूपाला आला. त्याने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्यात. आणि या भूमिकांमुळे आज तो घराघरात ओळखला जातो. अनेक मालिका करत असतांना त्याला नाना पाटेकर यांच्या ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात एक भूमिका मिळाली. त्याला या मालिकांमधून चांगली प्रसिद्धी तर मिळालीच पण त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला तो कॉमेडी सर्कसमधील त्याचा सहभाग....त्यातून त्याचा अभिनय आणखीनच खुलून आला. त्याचं मालिकांचं करिअर चांगलं जोरात सुरू असताना त्याला उमेश जाधव यांच्या ‘चेकमेट’ या चित्रपटात भूमिका मिळाली. आणि त्यानंतर सतीश राजवाडे यांच्या गाजलेल्या ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. सध्या स्वप्नील अनेक हिंदी मालिकांमध्ये अभिनय करतो आहे.

 
 

नाटक

सो कुल

 

टि, कॉफी ऑर मी(हिंदी)

१९९३

 

मालिका

एका लग्नाची दुसरी गोष्ट

 

क्रिष्णा

१९९३

अमानत

१९९७-२००२

कद कर दी

 

दिल विल प्यार व्यार

 

केहता है दिल

 

देस मे निकला होगा चॉंद

 

हरे कांच की चुडिया

 

कडवी खट्टी मिठ्ठी

 

रिश्ते

 

छोटा पॅकेट बडा धमाका

 

मि. अ‍ॅन्ड मिसेस. टिव्ही

 

ओऎ लक्की लक्की ओऎ

 

घर की बात है

 

सजन रे झूठ मत बोलो

 

कॉमेडी सर्कस ६

 

बजेगा बॅण्ड बाजा

 

महा संग्राम

 

पापड पोल

 
 

चित्रपट

मंगलाष्टक वन्समोअर

दुनियादारी

प्रेमाची गोष्ट

मुंबई-पुणे-मुंबई

गुलाम-ए-मुस्तफा

 

चेकमेट

२००८

 

२०१०

 
 

फोटो

 

व्हिडीओ