Sign In New user? Start here.

अमृता खानविलकर

 

 
 
 


अमृता खानविलकर

अभिनेत्री |

जन्मतारीख :- २३ नोव्हेंबर १९८४

परिचय-

सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक नवीन तरूण आणि सुंदर अभिनेत्र्यांची फौजच तयार झाली आहे. त्यातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.. अमृताने अनेक मालिका हिंदी मालिकांपासून आपल्या फिल्मी करीअरची सुरवात केली. अमृता २००४ साली झी टीव्हीवर झालेल्या ‘झी इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात ती तिस-या क्रमांकावर होती. त्यातूण तिला ‘सहारा वन’ वाहिनीच्या ‘टाईम बॉम्ब ९/११’ यात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने झी म्युझिक वरील ‘बॉलिवूड टूनाईट’ या शोचे देखील सूत्रसंचालन केले आहे. या कार्यक्रमांनंतर तिने ख-या अर्थाने तिच्या मराठी चित्रपट करीअरची सुरवात झाली.

अमृताची चित्रपटातील इनिंग सुरू झाली ती २००६ मध्ये आलेल्या गोलमाल या चित्रपटातून त्यानंतर तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली ती २००७ साली आलेल्या ‘साडे माडे तिन’ या सुपरहीट चित्रपटातून...चित्रपटांबरोबर अमृताने मराठी वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोजसाठी सुद्धा काम सुरू ठेवले. तिने झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक’ आणि ई-टीव्ही मराठीवरील ‘कॉमेडी एक्सप्रेस’ साठी सूत्रसंचालन केलं आहे. अमृता जरी सध्या मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री असली तरी तिने याआधी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत त्यात मुंबई सालसा, हॅट्रीक, कॉन्ट्रॅक्ट आणि फूंक या चित्रपटांचा समावेश करता येईल. अमृता तशी छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहचली होतीच तेवढ्यात तिला आणखी जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ ही लावणी अतिशय महत्वाची ठरली.

 
 

मालिका

अदा

(२००५)(हिंदी)

टाईम बॉम्ब ९/११

२००५(हिंदी)

एकापेक्षा एक

 

कॉमेडी एक्सप्रेस

 
 

चित्रपट

अर्जुन

२००६

गोलमाल

२००६

मुंबई सालसा

२००७(हिंदी)

साडे माडे तिन

२००७

हॅट्रीक

२००७(हिंदी)

कॉन्ट्रॅक्ट

२००८(हिंदी)

फुंक

२००८(हिंदी)

दोघात तिसरा आता सगळे विसरा

२००८

गैर

२००९

नटरंग

२०१०

फुंक - २

२०१०(हिंदी)

फक्त लढ म्हणा..!

२०११

झकास

२०११

सतरंगी रे

२०११

आयना का बायना

२०१3

 
     
 

फोटो

 

व्हिडीओ