Sign In New user? Start here.

अमृता सुभाष

 
 
 

अमृता सुभाषअभिनेत्री |

जन्मतारीख :- २३ मे

परिचय-

मराठी रंगभूमीवर नाव कमावून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणा-या अनेक अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीमध्ये आज आहेत. त्यातीलच आजच्या तरूण पिढीतील एका अभिनेत्रीपैकीच एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थीनी असलेल्या अमृताने एनएसडीमध्ये असतानाच अनेक मराठी, हिंदी, जर्मन नाटकांमध्ये काम केले. अमृताला तशी अभिनयाचे आणि संगीताचे बाळकडू तिच्या आईकडून म्हणजेच ज्योती सुभाष यांच्याकडूनच मिळाले. अनेक नाटकांमधील बहारदर भूमिकांमूळे अमृताची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यात तिला तिच्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील भूमिकेने अधिक प्रसिद्धी दिली. या नाटकानंतर तिची खरी ओळख निर्माण झाली. त्यानंतर तिने ऑस्कर पुरस्कार नामांकीत ‘श्वास’ या चित्रपटातील भूमिकेने एक वेगळाच ठसा उमटवला. आणि आज ती पठडीबाहेरच्या चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक आणि चित्रपटांबरोरच अमृताला प्रसिद्धी मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील ‘अवघाची संसार’ या मालिकेतील भूमिकेने...या मालिकेतील भूमिकेने आज तिला घराघरात ऒळखल्या जाते. या मालिके व्यतिरीक्त अमृताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर ब-याच कालावधीने तिचं एक नवीन नाटक नुकतंच येऊन गेलं ते म्हणजे ‘पुनश्च हनीमून’. हे नाटक अतिशय लोकप्रिय झालं. या नाटकाची महत्वाची गोष्ट म्हणजे या नाट्काचं लेखन, दिग्दर्शन तिचा पती संदेश कुलकर्णीने केलं असून यात त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिका सुद्ध केली आहे. याआधीही या दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे.

 
 

नाटक

मिव्हा(इंडो-जर्मन)

 

नई बझार

 

क्षीतीजापर्यंत समुद्र

 

सत्तेचे काय करायचे?

 

श्री तशी सौ

 

ती फुलराणी

 

पहिले वहिले

 

पुनश्च हनीमून

 
 

मालिका

अवघाची संसार(झी मराठी)

 

पाऊलखूणा

 

श्री

 

स्टार बेस्ट सेलर

 

भंवर

 

झोका

 

कथा

 
 

पुरस्कार

झी गौरव पुरस्कार

२००४(अवघाची संसार)

 

चित्रपट

बालक-पालक

२०१२

मसाला

२०१२

क्षणोक्षणी

(आगामी)

विहीर

 

गंध

२००९

त्या रात्री पाऊस होता

२००९

वळू

२००८

सावली

२००७

बंध

२००६

नितळ

२००६

बघ हात दाखवूण

२००६

देवराई

२००४

श्वास

२००३

चाकोरी

व्हाईट रेनबो

कवडसे

फ्रि किक

तीन बेहने