Sign In New user? Start here.

मिताली जगताप/वराडकर

 

 
 
 

मिताली जगताप/वराडकर

अभिनेत्री |

जन्मतारीख :- २१ नोव्हेंबर

परिचय-

बालपणी आशा काळेसह केलेल्या छोट्या भूमिकेतून मोठ्या पडद्याचे वेध लागलेली प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे मिताली जगताप-वराडकर. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या 'प्रतिबिंब' या नाटकाने खरी ओळख आणि चेहरा मितालीला दिला. मुळ औरंगाबादची मिताली मोठ्या पडद्याचे स्वप्र मनी घेऊन मुंबईच्या मायानगरीत दाखल झाली. 'बाबू बॅण्ड बाजा'तील तिच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तिचं स्वण पूर्ण झालं. मराठी चित्रपटसृष्टीत राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये आता मिताली जगतापचा समावेश झालाय. छोट्या पडद्यावरून तिने केलेली सुरुवात आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास नक्कीच वेगळ्या वाटेवरचा आणि नोंद घेण्यासारखा आहे. तिची वाटचाल सुरू झाली, ती औरंगाबाद येथून बालकलाकार म्हणून. नृत्याची प्रचंड आवड असल्याने ती शास्त्रीय नृत्य शिकली. अभिनयाची आवडही होतीच. औरंगाबादमध्ये अभिनयाचा श्रीगणेशा झाला तो एकांकिका स्पर्धांमधून. वेगवेगळ्या शैलीच्या अनेक एकांकिका तिनं त्यावेळी केल्या. व्यावसायिक अभिनय करायचा तर मुंबईशिवाय तरणोपाय नाही हे जाणून आई-वडीलांच्या पाठिंब्यावर तिने मुंबईची वाट धरली. आई-वडलांचे तिला एकच सांगणे होते, 'स्मिता पाटीलसारखी हो.' वेगवेगळ्या प्रायोगिक नाटकांतून ती शिकत होती, अभिनयही प्रगल्भ होत होता. दरम्यान, मालिका, जाहिराती आणि चित्रपटात काम करण्याच्या संधीच्या शोधात ती होती. मराठी सिनेमातला पहिला ब्रेक ठरला तो २००० सालामध्ये राजू या सिनेमाच्या रूपात. या सिनेमासाठी तिने राज्य शासनाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

 
 

नाटक'नो एक्झिट' (हिंदी)

 

'आविष्कार'

 

'इंदू काळे सरला भोळे'

 
 

मालिका

'मायलेक'

 

'पिंपळपान'

 

'टिकल ते पोलिटीकल'

 

'कुलवधू'

 

'वादळवाट'

 

'सीआयडी'(हिंदी)

 

'कगार'(हिंदी)

 

'कुसुम' (हिंदी)

 
 

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार - ‘बाबु बॅन्ड बाजा’ - २०१०

 
 

चित्रपट

बाबु बॅन्ड बाजा

२०१०

विठ्ठ्ल विठ्ठ्ल

 

आग

 

राजु

२०००

 
     
 

फोटो