Sign In New user? Start here.

मुक्ता बर्वे

 


 
 
 

मुक्ता बर्वे

अभिनेत्री|

जन्मतारीख :- १२ डिसेंबर

परिचय-

मुक्ता बर्वे ही रंगभूमी, मालिका आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सर्वांनाच सुपरिचीत आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याआधी मुक्ताने अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करून अभिनयाचे धडे घेतले. ललित कला केंद्र ची विद्यार्थीनी असलेल्या मुक्ताने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून आज ती मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ललित कला केंद्रात असतांना मुक्ताने ‘सखाराम बाईंडर’, ‘नाग-मंडल’, ‘हॅम्लेट’, ‘सिता स्वयंवर’ या अजरामर नाटकांसाठी वेशभूषा आणि संगीत विभागात अनेक जबाबदा-या सांभाळल्या आहेत. तसेच विजया मेहता, भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कर्नाड, सतिश आळेकर, विजय केंकरे, वामन केंद्रे, महेश एलकुंचवार राजीव नाईक यांच्याकडून तिने अभिनयाचे धडे घेतले आहे.

अनेक मालिकांमधील तिच्या भूमिकांना आजही प्रेक्षक आठवतात. चित्रपटांसोबतच तिने अनेक नाटकांमध्ये काम करणे सुरूच ठेवले. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या संधी चालून आल्या. प्रतिभावंत दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या ‘जोगवा’ चित्रपटातील तिची भूमिका अतिशय वेगळी आणि दर्जेदार अशी होती. त्यानंतर आलेल्या ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटात देखील प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेला पसंत केले. ‘जोगवा’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटातील भूमिकांसाठी मुक्ताला राज्य सरकारचा सर्वोत्कॄष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

 
 

नाटक

कब्बडी कब्बडी

 

हम तो तेरे आशिक है

 

देहभान

 

आम्हाला वेगळं व्हायचंय

 
 

चित्रपट

अग्निहोत्र

 

अग्निशिखा

 

घडलंय बिघडलंय

 

पिंपळपान

 

बुवा आला

 

बंधन

 

श्रीयुत गंगाधर टिपरे

 

आभाळमाया

 

इंद्रधनुष्य

 

मी एक बंधू

 

एक लग्नाची दुसरी गोष्ट

 
 

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल

२०११(आघात)

मिफ्ता पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

२०१०(मुंबई-पुणे-मुंबई)

संगीत नाटक अकॅडमीचा उस्ताद बिसमिल्लाह खान युवा पुरस्कार

२००९

राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

२००८-०९ (जोगवा)

राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक नाटक पुरस्कार

२००६-०७(कब्बडी कब्बडी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक नाटक महाराष्ट्र टाईम्स पुरस्कार

२००६-०७ (कब्बडी कब्बडी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक नाटक झी गौरव पुरस्कार

२००६-०७(कब्बडी कब्बडी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक नाटक मटा पुरस्कार

२००५-०६(फायनल ड्राफ्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक नाटक झी गौरव पुरस्कार

२००५-०६(फायनल ड्राफ्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक नाटक राज्य सरकार पुरस्कार

२००४-०५(हम तो तेरे आशिक है)

प्रयोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव पुरस्कार

२००४-०५ (फायनल ड्राफ्ट)

मोस्ट प्रॉमिसिंग न्युकमर इन द फिल्म

२००४-०५(चकवा)

सर्वोत्कॄष्ट सहायक अभिनेत्री अल्फा पुरस्कार

२००२-०३(देहभान)

 

चित्रपट

मंगलाष्टक वन्समोअर

२०१०

आघात

२०१०

मुंबई-पुणे-मुंबई

२०१०

जोगवा

२००९

सुंभरान

२००९

एक डाव धोबी पछाड

२००९

सास, बहु और सेंसेक्स

२००८

दे धक्का

२००८

सावर रे

२००७

माती-माय

२००६

ब्लाईंड गेम

२००६

चकवा

२००४

 
     
 

फोटो

 

व्हिडीओ