Sign In New user? Start here.

स्मिता तांबे 

 
 
 

स्मिता तांबे

अभिनेत्री |

जन्मतारीख :- १२ सप्टेबर

परिचय-

मूळ साता-याची असलेल्या स्मिताने पुण्यात अनेक वर्ष राहून,सिनेइंडस्ट्रीत दाखल होण्यासाठी मुंबईत गेली. तसा या क्षेत्रात येण्यास मुलींना घरातून विरोध असतो पण स्मिताच्या बाबतीत तसं झालं नाही. तिला तिच्या घरच्यांनी नेहमीच प्रतिसाद दिला. स्मिता एक प्रतिभावंत कलाकार म्हणून समोर येत आहे. तिने निभावलेली अनुबंध' मधली 'किट्टी' आणि जोगवा मधली भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. अभिनयासोबतच उत्तम नृत्यही स्मिता करते. ‘जोगवा’ या चित्रपटाच्या नृत्यदिग्दर्शनातही तिचा सहभाग होता. काही कलाकार आपल्याला मिळालेल्या संधीच सोनं करतात आणि स्वतःला सिद्ध करतात. स्मिता ही एक अशीच कष्टाळू आणि मिळेल ती भूमिका आव्हान म्हणून स्विकारणारी अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि चित्रपटात काही ताकदीच्या भूमिका निभावून तिची कारकिर्द सुरु केली आहे.

 
 

नाटक

हमिदाबाईची कोठी

 
 

मालिका

अनुबंध

 

आई

 

अनामिका

 

मन उधान वा-याचे

 

सोनियाचा उंबरा

 

साता जन्माच्या गाठी

 

एकापेक्षा एक-अप्सरा आली(रिअॅ लिटी शो)

 
 

चित्रपट

जोगवा

 

धूसर

 

एक डाव धोबी पछाड

 

हरिश्चंद्राची फॅक्टरी

 

मनातल्या मनात

 
 
     
 

फोटो