Sign In New user? Start here.

सोनाली कुलकर्णी

Sonalee Kulkarni

 

 
 
 


सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री |

जन्मतारीख :- १८ मे

परिचय-

सोनाली कुलकर्णी आजच्या मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणून सर्वांना सुपरिचीत अभिनेत्री. आर्मीचं बॅकग्राऊंड असलेल्या परिवारातून आलेली सोनाली पहिल्य़ांदा कॅमेरासमोर उभी राहीली ती एफटीआयआय मधील एका विद्यार्थ्याच्या माहितीपटाच्या शूटींगसाठी...त्यानंतर तिच्या मराठी इंडस्ट्रीतील अभिनयाला सुरवात झाली ती ई- टीव्हीवरील ‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेतून...या मालिकेच्या सेटवर सोनालीला तिच्या तिच्या पहिल्या चित्रपटाची म्हणजेच ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. या तिला एक छोटी भूमिका मिळाली होती. मात्र याच चित्रपटातील तिच्या भूमिकेला पाहून दिग्दर्शक केदार शिंदे ह्यांनी तिला त्यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीचा रोल दिला. आणि या पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाला रज्य पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि इथपासून तिच्या चित्रपट करीअरला ख-या अर्थाने सुरवात झाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले ज्यातून तिला अधिक प्रसिद्धी मिळत गेली. मात्र तिला भारतभर ओळख मिळाली ती तिच्या नुकत्याच येऊन गेलेल्या सुपर डुपर हिट ‘नटरंग’ या चित्रपटाने...या चित्रपटातील तिच्या अभिनयाची आणि बहारदार नृत्याची सर्वीकडे चांगलीच दखल घेण्यात आली. आणि आज ती मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे....

 
 

मालिका

हा खेळ संचिताचा

 
 

पुरस्कार

महाराष्ट्राची फेव्हरेट हिरोईन पुरस्कार(२०१०)(नटरंग)

 

महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस पुरस्कार(२०१०)

 

४५ वा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन डेब्युटंट महाराष्ट्र राज्य पुरस्कार(बकुळा नावदेव घोटाळे)(२००८)

 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झी गौरव पुरस्कार(२००८)(बकुळा नामदेव घोटाळे)

 

नर्गिस दत्त पुरस्कार- उभरता हुआ सितारा(२००६)

 
 

चित्रपट

ग्रॅन्ड मस्ती

२०१३

झपाटलेला २

२०१३

स सासुचा

२०१०

नटरंग

२०१०

क्षणभर विश्रांती

२०१०

इरादा पक्का

२०१०

बकुळा नामदेव घोटाळे

२००७

हाय काय नाय काय

२००९

गाढवाचं लग्न

२००७

     
 

फोटो

 

व्हिडीओ