Sign In New user? Start here.

माझी जाहिरातबाजी

माझी जाहिरातबाजी भाग - 2

 

अदिती मोहिले

मागच्या आठवड्यात मी १८ वर्षांपूर्वीची जाहिरातींनी झपाटलेल्या माझी दिनचर्या मांडली. माझ्या कल्पनेपेक्षा जास्त मला response मिळाला. आजच्या भाषेत 'hits' मिळाल्या. तर जर तुम्हाला तुमची जाहिरातबाजी करायची असेल, तर तुमची आवडती जाहिरात कोणती व का हे मला लिहायला विसरू नका This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर. माझ्या आगामी blogs मध्ये मी नक्की तुमचा आणि तुमच्या जाहिरातीचा उल्लेख करेन. सांगायचा मुद्दा हा आहे की या जाहिरातींमधले बरेचसे products आपण आजही आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की या products ची marketing strategy, जाहिरातीचा गाभा अजूनही बर्याच अंशी तोच आहे. Fascinating .. Isn't it ? मागील भागापासून आता पुढे..

माझी जाहिरातबाजी - भाग २

..पण बाकी काहीही म्हणा, आपल्या सुखसोयींसाठी (?) हे जाहिरातदार किती झटतात नाही? खरं तर आता सुखकर्ता दुखहर्ता म्हणून गणपतीला आळवायची काहीच गरज नाहीये. कारण आपल्या सगळ्या गरजा हे manufacturer आणि advertisers पुरवतात. आपण फक्त ही विविध products वापरायची duty आमरण करत राहायची. आमरण अशासाठी की अगदी बाळ जन्माला आल्यावर त्याची मालिश डाबर लाल तेल किंवा Johnson & Johnson baby oil ने करण्यापासून ते तो अगदी पार्ले G खाऊन तंदुरुस्त म्हातारा होईपर्यंत सगळ्या stages या manufacturer आणि advertisers च्या मदतीने पार पाडतो.

लिफ्ट बिघडली तर जिने चढायला आजोबांना त्रास होऊ नये म्हणून आमच्याकडे डाबर च्यवनप्राश आहे आणि तरीही तळवे दुखले तर आजोबांच्या दिमतीला आजीबरोबर कैलाश जीवनही आहे. केलेला अभ्यास लक्षात राहावा म्हणून माझ्या भावाला आई वैद्यनाथ चं शंखपुष्पी syrupही देते आणि योग्य वाढीसाठी दुधात घालून complan ही देते.

शिवाय शेजारच्या मुलाच्या खोकल्याचा त्याच्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून डाबर च्यवनप्राश तैनातीला असतंच. मोलकरीण आली नाही तर भांडी घासायला Vim बार ही आहे आणि स्वस्तात liquid soap हवा असेल तर Vim Micro देखील आहे. पार्टीला जायचं आणि शेजारच्या tommy ने तुमचं ड्रेस खराब केला तर आमच्याकडे विडिओकॉन वाशिंग मशीन ही आहे आणि सामोसा खाताना डाग पडले तर त्यासाठी surf excel ही आहे.

Healthy and tasty breakfast fast हवा असेल तर आमच्याकडे kellogg's cornflakes ही आहेत आणि ५ मिनिटात भूक भागवायला maggie noodles ही आहेत. कमी तेलातले डोसे खायचे असतील तर आमच्याकडे निर्लेपचा तवाही आहे आणि केलेले पदार्थ ताजे ठेवण्यासाठी real value vacuumizer सुद्धा आहे. Interview ला जाताना माझी ताई दूध जैसी सफेदी साठी निरमा ने धुतलेले कपडे ही घालते आणि to be on safer side, impression मारायला ponds पावडर ही लावते. शिवाय अधून मधून गोरं दिसायची लहर आली तर fair & lovely , १५ मिनिटांमध्ये उजळण्यासाठी फेम bleach यांसारखी क्रीम्स तैनातीला असतातच.

माझ्यामते वेगवेगळ्या जाहिरातींचा आपल्या रोजच्या घडामोडींवर किती परिणाम होतो हे सांगायला सध्या एवढे पुरे. खरं तर यात बिचा-या जाहिरातदारांचा तरी काय दोष हो? कारण या जगात ओरडणा-यांची करवंदे खपतात पण गप्प बसणा-यांची द्राक्षे सुद्धा खपत नाहीत. मग आपली करवंदे ही द्राक्षा इतकीच चांगली आहेत हे जगाला नको का पटवून द्यायला! मी हे का म्हणतेय हे तुमच्या लक्षात आलं असेलच. नाही? अहो, मगासपासून मी आमच्याकडे असलेल्या products ची आणि पर्यायाने माझी जाहिरातच तर करतेय.

So again .. तुमची आवडती जाहिरात कोणती व का हे मला लिहायला विसरू नका This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर. माझ्या आगामी blogs मध्ये मी नक्की तुमचा आणि तुमच्या जाहिरातीचा उल्लेख करेन.

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

क्रमश:

अदिती मोहिले
क्रिएटीव्ह डिरेक्टर
सातेरी सॉफ्टवेअर प्रा.लि.