Sign In New user? Start here.

 

Child & Advertising ...एक फसलेला प्रयोग

 

अदिती मोहिले

रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स, कॉलेज चे ते छान दिवस. Creative field मध्ये असल्याने कल्पनांना अगदी पंख फुटायचे.

मी commercial arts च्या शेवट च्या वर्षाला होते. आमच्या कॉलेज मध्ये last year म्हणजे full too धमाल. अख्या वर्षाला मिळून एक campaign करायचे. कुठलेही product किंवा service निवडा आणि त्याचे advertising campaign करा. Generally speaking, जास्त routine च्या बाहेर न जाता चौकटीतला topic निवडला की निदान काय म्हणायचं ते न कळण्याची risk बाद होते. माझा टॉपिक नवा होता पण त्या product साठी वापरले जाणारे माध्यम तर अगदी हमखास यशातल्या चौकटीत बसणारे होते आणि ते होते लहान मुलांशी निगडीत आणि म्हणूनच मी "तो" topic निवडला.

नुकतीच मी आधीच्या सुट्टीत अमेरिकेला जाऊन आले होते. लोकं पुस्तकांची पाने खातात (असे सगळ्या वाचकांबद्दल म्हटले तरी जाते) तशी मी जाहिराती प्यायचे. म्हणजे वाचण्याला जर खाणे असे संबोधले जाते तर बघण्याला पिणे ही उपमा ठीक आहे नं? Amazing detailing ! लोकं म्हणतात की भारतात creativity जास्त आहे. आहे, no doubt आहे. पण presentation हा जो काही प्रकार आहे तो पाश्चात्य देशांमध्ये कुट कुट के भरा है. कुठलेही product पाच पैशाचे का असेना ते पाचशे रुपयांचे कसे दिसेल यासाठी हे लोकं भर देतात. लोकहो, हे जाहिरातींचे युग आहे. इथे जर तुम्ही जगाला ओरडून नाही सांगितलेत तर तुमच्या product चा फायदा तरी काय. विकत घेणे तर सोडा पण त्याच्या quality वर तरी कोण विश्वास ठेवणार आहे? Packaging , wrapping हा जो काही अफलातून प्रकार आहे तो मी अमेरिकेत अनुभवला जाहिरातींच्या रुपात. Peer pressure म्हणा किंवा तुम्ही खरे खुरे प्रेमात पडा म्हणा, शेवटी हेतू साध्य करूनच हे जाहिरातदार त्यांची जवाबदारी पार पडतात.

तर अशाच एका 'subject ' ने भारावलेल्या मी, माझा campaign चा विषय निवडला. In my defense , मीही अशीच जाहिरातींच्या प्रेमात पडले होते. त्याला पोषक वातावरणही होते घरात. नाही असे नाही.

नुकताच माझ्या एकुलत्या एका लाडक्या भाचीचा जन्म झाला होता. अमेरिकेतला हा पहिला लहान बाळाबरोबरचा अनुभव. जाहिरातींमध्ये, Emotional टार्गेट म्हणून तसेही लहान मुलांना फार portray करतात. TV मध्ये, magazines मध्ये, malls मध्ये, बघावे तिथे आपल्या मनावर बिंबवत असतात. आता तर भारतातही या साच्याची अंमलबजावणी चोख पणे होतेय. न्यूजपेपर मध्ये एक आजच कार्टून बघितले त्यात आई मुलाला विचारतेय, काय रे, सुट्टी चालू आहे तर तुला तुझी सीरिअल बघायचीए का, तर मुलगा धसका घेतल्यासारखा म्हणतो, "नको, त्यात पण back to school च्याच जाहिराती जास्त आहेत. कशाला आठवण करून देतात.. त्यापेक्षा TV नको. ". पण हा झाला हल्लीचा जमाना.

तर अशाच जाहिरातींना भुलून माझ्या campaign product चा जन्म झाला. "Huggies Diapers " . ही गोष्ट आहे साधारण १५ वर्षांपूर्वीची. आपण एखादी परिस्थिती कशी सहज सामावून घेतो. आता विचार केला तर "diapers " या विषयात नं पटण्यासारखे काहीच नाहीये.

TV वरची काजोल ची "गीलापन नही तो कोशिंशे कई" ही huggies ची advertise आठवत असेल. How can you not love lovely mom, cute kid and the super helper diapers ?

Diapers हा लहान मुलांच्या आयुष्यातला आणि त्याला जोडणाऱ्या सगळ्या लोकांचा हा किती अविभाज्य घटक आहे हे पटवून द्यायला मला दुसऱ्या campaign ची गरज नाही. पण १५ वर्षांपूर्वी हा विषय कोणाला रुचलाच नाही. रुचण्यापेक्षा कोणाला कळला पण नाही. सरांना नाही, विद्यार्थ्यांना नाही, माझ्या "target audience " ला देखील नाही.

माझ्या तर्कांप्रमाणे, जाहिरातींचा सगळ्यात weak point म्हणजे "मुले". छान छान बाळे आहेत, slogans आहेत, presentation आहे, product उपयोगी आहे, थोडक्यात आपण ज्याला "no brainer " म्हणतो तसे सगळे जुळून आलेले असले तर प्रयोग फसावाच का? भावनांचे खेळ जर हे मानले,

calculative risk, peer pressure मध्ये शोषण होऊन जर ग्राहक तयार झालाय, चक्रव्युहात अडकला गेलाय असे आपण मानले, किंवा अगदी, नवीन बाजारात काही येतंय म्हणून त्याचं स्वागतही करतोय.. इतका जर का दृष्टीकोन बदललाय तर मग नक्की कुठे चुकलं? एक महत्वाचा मुद्दा इथे माझ्या डोक्यातून निसटला की त्या विषयाचे स्वागत करण्यासाठी पोषक वातावरण तेंव्हा भारतात तयार झालेले नव्हते. काळ ही आला नव्हता आणि वेळही. Wrong place wrong time याचे मूर्तिमंत उदाहरण होते ते. माझे advt campaign सपशेल पडले ते मुख्यत्वे यासाठी.

तात्पर्य काय, तर नुसतेच सगळे छान दिसून चालत नाही तर ते आत्मसात करायला, adapt करायला योग्य परिस्थिती निर्माण करावी लागते. आणि तुमच्यात जर परिस्थिती निर्माण करायची धमक नसेल तर गपचूप चावून चोथा झालेले ( सभ्य भाषेत, दैनंदिन जीवनातले) विषय निवडा आणि त्यामध्ये तुमची creativity ओतायचा प्रयत्न करा.

किंवा..जाहिरातक्षेत्रात उल्लेखनीय क्रांती घडवण्यास सुसज्ज व्हा.

जय हिंद! जय जाहिरातबाजी!

ता.क.- नेहमीप्रमाणेच, तुमची all time favorite जाहिरात कोणती हे मला लिहायला विसरू नका.

अदिती मोहिले ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )
क्रिएटीव्ह डिरेक्टर
सातेरी सॉफ्टवेअर प्रा.लि.