Sign In New user? Start here.

नातं तुझं नि माझं..

नातं तुझं नि माझं..

 

अदिती मोहिले

आपण इतके कसे गुंतत जातो यार? दुसर्यांची सुखं दुख्ख इतकी आपली कशी काय व्हायला लागतात? अमेरिकेत इतक्या वर्षांमध्ये हे bonding कधीच नाही झाले, आणि आता तर मी माझ्या teenage मध्ये पण नाहीये तरीही इतकी ओढ का? कदाचित अमेरिकेत मी, LA मध्ये राहत असते तर अशीच आत्मीयता असती. कदाचित आता मी आमच्या मुंबईत परत आल्याने हे प्रेम दाटून आले असेल. मुंबईत सगळ्याच गोष्टींच्या तारा लगेच जुळून जातात. सगळं हक्काचं, आपलंच आहे असं वाटत रहात. या शहरात घडणारा प्रत्येक छोटा-मोठा event म्हणजे "घरचं कार्य"च बनून जातं. त्यांच्या लेखी तर आपण individual म्हणून exist पण नाही करत आणि तरीही आपण त्यांचे जबरदस्त 'fan ' असतो.

Movies येतात आणि जातात. आपण करमणूक म्हणून बघतो, मित्रांबरोबर 'outing ' म्हणून बघतो, वेळ जात नाही म्हणून बघतो, कधी कधी कर्तव्य म्हणून पण बघतो. कुठल्याही कारणाने बघो पण या सगळ्यांमध्ये एक आशावादीचा common घटक आहे. निदान मी तरी movie बघताना मनात खूप आशा ठेऊन जाते की तो चांगला निघावा.. चार लोकांमध्ये त्याची चर्चा व्हावी. newcomer डिरेक्टर/actor असेल तर त्याचे कौतुक व्हावे. अशा पार्श्वभूमीवर एखादा movie जोरदार आपटला तर मला खरंच आतून वाईट वाटत राहत. Movie वाल्यांचं सांत्वन करावसं वाटतं.

पुन्हा पुन्हा येऊन मी त्याच मुद्यावर येते.. असा का व्हावं? इतका जिव्हाळा का? हे कसलं नातं? आणि मग मला अचानक साक्षात्कार होतो. हा नकळत झालेला जाहिरातींचाच परिणाम. "बर्फी"- गेले कित्येक दिवस मी या सिनेमाची वाट बघतेय.. प्रोमो release झाल्यापासून तर जास्तच. परीक्षेचा result जवळ येतो तेंव्हा कसं आपल्या छातीत धडधड व्हायला लागतं, तसंच काहीसं या Movie च्या release च्या वेळेस मला वाटत होतं. जसजसे दिवस जवळ येत होते तशी ती धडधड आणखीन वाढायला लागली आणि शेवटी आज result लागला.

आमचा बाळ्या first क्लास मध्ये पास झाला. पेढे… I mean बर्फी आणा. विश्वास होताच. ते नातं या जाहिरातींच्या माध्यमातून जुळलं होतंच. News channels , serials, reality shows ..वेगवेगळ्या माध्यमातून बर्फी आपल्या समोर गेले कित्येक दिवस येत होता. बरोब्बर एका आठवड्यापूर्वी रणबीर मला (read it as bombilfryday .com ला ) म्हणाला की तुम्ही उद्या मिठीच्या दुकानात गेलात आणि म्हणालात की जरा बर्फी देना..तर दुकानदार म्हणेल अरे ती इथे कुठे? अस्सल बर्फी तर theater मध्ये लागलीये. हे किती तंतोतंत खरं आहे याची प्रचीती पिक्चर बघून येते. Flawless from every angle . पण मी इथे movie चे गुणगान करायला नाही बसलेय. संपूर्ण review साठी येथे click करा. इथे मी आवर्जून, जाहिरातींचे माध्यम हिंदी सिनेमावाले कसे creatively हाताळतात ही कळकळ व्यक्त करण्यासाठी लिहितेय.

हो मी मराठी आहे. आणि मराठी असल्याचा मला जाज्वल्य अभिमान आहे. वगैरे वगैरे.. पण हे नातं मराठी सिनेमांबद्दल का नाही रूळलंय ? का माझी हृदयाची धडधड मराठी release च्या वेळेस वाढत नाही? अर्थात सगळ्याला अपवाद तर असतातच. आणि तसे ते काही मराठी movies बद्दलही आहेत. मला माहितीये, की हे मी लिहून खूप जणांकडून रोष पत्करून घेणार आहे. पण हा प्रश्न मी मराठी industry मधल्या माझ्या सगळ्याच मित्र मैत्रिणींना नेहमीच विचारात आलेय. का आपण मराठी लोक publicity कडे इतके दुर्लक्ष करतो? आम्ही खूप creative असतो, विषय वेगळे असतात, content चांगला असतो पण माझे नेहमीचे ब्रीदवाक्य जे आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत मराठी निबंध स्पर्धेत वापरले असेल तेच मी परत इथे लिहितेय, "ओरड्णार्यांची करवंदे खपतात पण गप्प बसणार्यांची द्राक्षे सुद्धा खपत नाहीत"

मग आपली द्राक्षे किती गोड आहेत हे ओरडून सांगावेच लागणार नं. त्याशिवाय तुमच्या भावना लोकांपर्यंत पोचणार तरी कश्या? bollywood producers कडे पैसे असतात. मराठी movies निघेपर्यंतच prodcers च्या नाकी नऊ येते हा मुद्दा आता चावून चोथा झालाय. मुळात आपली मराठी प्रवृत्ती अशी असते की सगळं शेवटपर्यंत झाकून ठेवायचं.. आणि अगदी शेवटी सगळं छान तयार झालं की मगच फक्त दाखवायचं. पावसाळ्यात आयत्या वेळेस पाऊस पडायला लागल्यावर सेल सेल चे बोर्ड लावून, एकदम overwhelm करून कितीसे लोकं आत शिरणारेत? आधीपासून दुकानाची जाहिरात तर करा. आत तुम्ही काय विकणार आहात याची लोकांना कल्पना तर द्या. लोकांना त्यांना मनाची तयारी तर करू द्या. सिनेमा यायच्या वेळेस एकदम हल्ला चढवलात तर मग तेंव्हा प्रेक्षक तयार असेलच याची खात्री बाळगू नका.

मान्य आहे की तरुण जनता हिंदी सिनेमे जास्त निवडतात. होय, given a choice , मी वीकेंड ला मराठीपेक्षा, हिंदी release झालेला moive बघायला जाईन. पण यात फक्त प्रेक्षकांनाच का दोष? टाळी एका हाताने नाही ना वाजत. जरा करा नं गवगवा.. लोकांच्या मनात भूक पैदा तर करा. प्रेक्षक वर्ग तयार तर करा. जाहिरातींसारखे इतके अद्यावत माध्यम असताना १-२ आठवडे आधी फक्त जोरदार publicity करून म्हणावा तसा अपेक्षित परिणाम साध्य नाही होत ही इतकी सरळ सोप्पी गोष्ट हिंदी movies कडे बघून तरी आत्मसात करावी हीच माझी सर्व इच्छुक आणि संबंधित लोकांना कळकळीची विनंती. कळावे लोभ असावा. जय हिंद! जय जाहिरातबाजी!