Sign In New user? Start here.

माझी जाहिरातबाजी

 

 

 
 
 
 
 
 

माझी जाहिरातबाजी

 

अदिती मोहिले

जाहिरातींचे पंखे (advertising fans) आपण कुठल्या न कुठल्या level वर असतोच. पण हा उच्चांक गाठायला कधीपासून सुरवात होते नक्की हे आठवून बघा. म्हणजे असंय कि लहानपणापासून आपल्याला नकळत जाहिरातींचं बाळकडू मिळालेलं असतं. त्यामुळेच मोठं झाल्यावर एकही जाहिरात नं आवडणारी व्यक्ती सापडणं तसं कठीणच. म्हणजे शिरीष काणेकर म्हणतात नं फिल्लमबाजी मध्ये तसं. तुमच्या मुलाला जर हिरो बनवायचं असेल तर लहानपणापासूनच त्याला जनमगुट्टी सारखा 'गाजर का हलवा' चमचा चमचा देत जा. लहानपणापासून एखादी गोष्ट आपण जर बघत आलो, त्याचा पाठ गिरवत आलो तर ती आपसूकच अंगवळणी पडते.

My first memory

माझ्या लहानपणीची पहिली जाहिरात जिचा माझ्यावर पगडा होता अशी मला नक्की नाही आठवत पण मला आठवतंय, दिवाळीमध्ये तेंव्हा आवर्जून पहिल्या अंघोळीसाठी मोती वगैरे नवीन साबण वापरायला आई द्यायची. साधारण 80s मध्ये, डिम्पल कपाडिया गोदरेज निर्मित, Crowning Glory नावाच्या साबणाची जाहिरात करायची. ती इतकी खरी वाटायची कि बस, हा साबण वापरला कि माझे पण केस डिम्पल सारखे होणार याची जवळपास खात्री पटली आणि मला त्या दिवाळीला डिम्पल च्या Crowning Glory ने अभ्यंग स्नान घडवले. शाम्पू हा आपल्या केसांचा आता अविभाज्य घटक असताना, तेंव्हा साबण कसा काय खपून गेला देव जाणे. हे झालं जरा मोठ झाल्यावरचं उदाहरण. लहानपणी TV वर ठराविक channels आणि ठराविक दिसणारे प्रोग्राम्स यामुळे जाहिरातीतल्या युगातलं smart बनायचं राहून गेलं. (ठराविक हाताच्या बोटावर प्रोग्राम्स बघायला मिळायचे असा उल्लेख मी मुद्दामच टाळलाय).

Target audience -

आजची पिढी आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे. New generation या नावाखाली हि पिढी हुशार असणारच हे कारण आहे, कि निरनिराळी माहिती (हवी आणि नको असलेली) at fingertips मिळते म्हणून, कि या मुलांवर पण जाहिरातींचा पगडा आमच्या काळा इतकाच तगडा आहे आणि ते रोजच्या दैनंदिन व्यवहारात त्याचा चपखल उपयोग करून घेतात म्हणून smart असतात का ते माहित नाही.

नक्की टार्गेट कोण असतं? मुले कि त्यांचे आई वडील? कि दोन्ही?

फक्त लहान मुलांचे म्हणून जे channels असतात, ते entertainment च्या बरोबरीनेच break मधल्या जाहिरातींवर पण भर देतात. हल्ली मुलांना grocery store मध्ये घेऊन जायचे म्हणजे धडकी भरते. कुठेही एकंच चित्र- Demand ! मग ती new X box ची aso, latest Wii gadget असो किंवा अगदी फुटकळ हिप्पो शूटर असो. Negotiations करून हवे ते मिळवण्याची कला मुलांकडे उपजत असते. Just face it . Kids are more adaptive to new ideas, advertises .

कार्टून्स हे आता फारसे funny आणि silly नाही राहिले. ते आता बनलेत काही विशिष्ठ खेळणी किंवा TV वरच्या प्रोग्राम्स साठीच्या, मोठमोठ्या जाहिराती. हल्लीच्या काळातली मुलांसाठी 'the biggest advertisers ' आहे Hannah Montana . प्रत्येक लहान मुलीला तिच्यासारखे कपडे हवे असतात, bag , shoes , केस आणि जे काही possible होईल ते सगळं..फक्त तिच्यासारखं दिसण्यासाठी.

आमच्या लहानपणी "character branding " हा प्रकार follow करायला नसला तरीदेखील कुठल्या ना कुठल्या form मध्ये आम्ही जाहिरातींची अंमल बजावणी करतंच होतो. TV वर बघितलेले मागतही होतो. परिणाम होवो कि ना होवो पण प्रयत्न कधी सोडले नाहीत.

काही kids products मध्ये मात्र parents already convinced असतात. परीक्षांचे दिवस जवळ आले कि माझी आई मला वैद्यनाथ चं शंखपुष्पी syrup द्यायची. मुलीची बुद्धी तल्लख व्हावी म्हणून प्रयत्न ती तिच्या परीने करायची तर आमच्या पार्ल्यातल्या 'world famous' हुशार सोसायटीमध्ये टिकण्यासाठी मला बरे मार्क्स मिळावे म्हणून मी हि ते तितकेच आत्मीयतेने घ्यायचे.

शाळेत बुटका असं मुलं चिडवतात म्हणून complan घ्यायचं आणि taller, sharper , smarter बनायचं हे जितकं आईला भावतं तितकंच ते मुलाच्या भावनांनाही सुखावतं. kellogs chocos सारखा simple breakfast करिष्मा कपूर सारख्या आईकडून खाऊनही बस ला late झाल्यावर धावायला, उन्हाळ्यात energy conserve करायला ग्लुकॉन D जर मुलगा पीत असेल तर कोण आईची बिशाद कि ग्लुकॉन D नको घेऊया म्हणायची? (वाक्य खूप मोठं वाटत असेल तर try शंखपुष्पी syrup).

पुरुषाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून निघतो हे जरी खरं असलं तरी "Tummy खुश तो mummy भी खुश" असा प्रेमसंवाद आपण काजोल आणि तिच्या जाहिरातीतल्या मुलामध्ये बघतो. कसा तो शहाण्या मुलासारखा ७ वाजता healthy Knor Soup पितो आणि आईची मधल्या वेळेला खाणं बनवायची चिंता मिटवतो. हे बघून आईने हा प्रयोग घरी नाही केला तरच नवल. मुलगा समजा अगदी नाहीच ऐकला (एकुलता एक असल्याने), तर हृदयाचा रस्ता वगैरे काढायला हक्काचा नवरा आहेच. तर अशी हि BOGO (Buy one Get one free ) ची ऑफर कोण सोडणार?

टार्गेट जिंकता जिंकता मुलांना समोर ठेवून emotions ना कसा खोलवर हात घालायचा हे गणित जाहिरातदारांना बरोबर उमजलय.

दैनंदिन कुटुंबातल्या जाहिरातीत सगळ्यात मुले दिसतात. उन्हाळ्यात energy save व्हावी म्हणून जाहिरात, पावसात किटानु पासून लांब राहावे म्हणून जाहिरात, थंडीत उबदार कपड्यांची जाहिरात, परीक्षेत immunity वाढावी म्हणून जाहिरात, खाण्याची पिण्याची, झोपण्याची, उठण्याची, आंघोळीची.... U name it and they have it !

कधीकधी असं वाटतं कि हे सगळे भावनांचे खेळ आहेत तर कधी वाटतं हि सगळी calculative risk आहे. मग तुम्ही त्याला "आम्ही या गुंतागुंतीत, peer pressure मध्ये भरडले गेलोय, पुरते अडकले गेलोय" असं म्हणा किंवा रोज बाजारात काहीतरी नवीन येतंय, काहीतरी नवीन शिकता येतंय, ज्ञानात भर पडतेय, life easy होतंय म्हणून त्याचं स्वागत करा (स्वतःच्याच पैशांनी) हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन आहे. आणि तो दाखवण्याचा या जाहिरातदारांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. क्रमशः..

ता.क.- नेहमीप्रमाणेच, तुमची all time favorite जाहिरात कोणती हे मला लिहायला विसरू नका.

अदिती मोहिले ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )
क्रिएटीव्ह डिरेक्टर
सातेरी सॉफ्टवेअर प्रा.लि.