Sign In New user? Start here.

guru paurunima special Blog 2013
अदिती मोहिले

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने..

संस्कार म्हणजे नक्की काय? आपल्याला आपले आई वडील आजी आजोबा देतात ते संस्कार, आपण ज्या वातावरणात वावरतो ते संस्कार आणि आपण आपल्या आयुष्यातल्या सर्वात निरागस आणि पक्या आठवणी घडवतो ती शाळा म्हणजे देखील संस्कारच.

पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले, मुंबई हे आमच्या तमाम पार्ल्याचे विद्यालय. पहिलीपासून दहावी पर्यंतच्या सगळ्या बाई म्हणजे आमच्या गुरु.

गुरु, जो आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्या विचारांना योग्य खतपाणी घालतो. जो स्वतः पडद्या आड असतो पण सदैव आपल्या पाठीशी राहून (अदृश्य किंवा सदृश्य रुपात ) आपली हिम्मत वाढवतो. कमकुवत मनाचा सहारा बनतो आणि आपल्या यशातच स्वतः जग जिंकल्याचा आनंद बघतो .

माझा पहिला गुरु- पहिलीत मी सगळ्या तुकड्यांमधून पहिली आले तेंव्हा तो चिमुकला आनंद मला सर्वात आधी माझ्या पाटणकर बाईंबरोबर share करायचा होता. त्यांचा पत्ता पार्ल्यात विचारात विचारात हातात पेढ्यांचा box घेऊन शेवटी मी आईबरोबर पोचले तर घराला मोठ्ठाले कुलुप. माझ्या लाडक्या बाई, माझ्या पहिल्या गुरुला मला पहिला पेढा देता न आल्यामुळे झालेलं माझं खट्टू मन मला अजूनही आठवतंय.

guru paurunima special Blog 2013

माझा साहित्यिक गुरु- आम्ही पडलो, धडपडलो, परत हसून उठलो, पुढे जात राहिलो, अधाशासारखी पुस्तकाची पाने खाल्ली, Anybody Can Write चे तत्वं अवलंबत सुचेल ते लिहित राहिलो ते फक्त एका साहित्तिक गुरूच्या मदतीने. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे पु.ल. देशपांडे. आमची विचारसरणी, भाषा, वर्णन करायची शैली, observation skills (हो. मराठीत लिहिताना इंग्रजी शब्दांचा वापर केला तरी चालतो हे देखील पु.लंच्याच लिखाण शैलीच्या परवानगीने), हे सगळंच मोठं होताना आमच्या जगण्याचा अविभाज्य घटक होता आणि आजही आहे. आजही चार PTV मधले मित्र मैत्रिणी जमलो की पुलंचा उल्लेख काहीतरी निमित्ताने होतोच. आमच्या रक्तात पु.ल आहेत आणि ती जागा कोणीही नाही घेऊ शकत.

guru paurunima special Blog 2013

चुका, शिक्षा आणि दिक्षा - शाळेतल्या अखेरच्या दिवसांमधला माझा गुरु म्हणजे माझ्या दहावीच्या वर्गशिक्षिका, सहस्त्रबुद्धे बाई. माझ्यात सर्वप्रथम आत्मविश्वास निर्माण केला माझ्या बाईंनी. हुशार तुकडीत असून मी खूप हुशार नव्हते पण मला चित्रकलेत प्रोत्साहन दिले ते या बाईनी. आमच्या शाळेचं तेंव्हा एक magazine निघायचं. त्याचं सगळं composition, design करायच्या team मध्ये मी होते. त्याचा मुखपृष्ठ देखील मीच design केलं होतं. माझ्यासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट होती. सगळे म्हणतात कि ९ च्या (so called हुशार) तुकडीतल्या मुलांना special treatment मिळते. पण face it. बाहेर जाऊन मोठ्या जगात तुम्हाला काही बनायचं असेल तर स्पर्धेला तोड नाही. मी देखील बाईंचा खूप ओरडा खाल्लाय, चुका झाल्यात पण at the end, जेंव्हा माझा दुसरीतला मुलगा, "I did not knew it " म्हणतो, तेंव्हा बाईंचा english चा तास आठवतो. "एका वाक्यात दोन भुतं (भूतकाळ )रहात नाहीत". खरं तर माझा मुलगा कशाला, १० पैकी निदान ७ लोकं तरी असंच इंग्लिश लिहितात. there आणि their हमखास चुकीच्या जागी वापरलेलं असतं. बाईंच्या perfect conventional आणि unconventional शिकवण्याच्या पद्धतीमुळे आज मी खूप sorted आहे असं मला वाटतं.

guru paurunima special Blog 2013

Painitng गुरु- अंड्यातून बाहेर पडून जगाला सामोरं जायची वेळ आली तेंव्हा मला अतिशय sensitive, शांत, समंजस आणि अफलातून drawing skills असलेली एकमेव व्यक्ती मित्राच्या रुपात भेटली, विशाल वाडये. चित्रकलेसाठी लागणारे observation skills मी त्याच्याकडून शिकले. तेंव्हापासून मानलेला गुरु आजही मला आयुष्यात अधून मधून अडचणीत मार्गदर्शन करतो. “Fight back in every difficult situation” हा त्याचा गुरुमंत्र.

guru paurunima special Blog 2013

फिरंग गुरु- माझ्या सौभाग्याने मला अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. Multimedia Design मधल्या त्या २ वर्षात मला वेगवेगळ्या क्षेत्रातले गुरु भेटले. "Typo" शिकवणाऱ्या Ana szabadas, "communication" शिकवणारे Riki सर यांनी तावून सुलाखून तयार केलं. "History ऑफ आर्ट्स"ची theory शिकत असताना teacher नी, piracy बद्दल दिलेल्या कडक lecture मुळे clear thinking करायला शिकवलं. भारतात, कुठल्याही गोष्टींची सहज विनासायास कॉपी होत असते असं निदान design क्ष्रेत्रात आवर्जून बघायला मिळते. मेहनतीला पर्याय नाही हा अनुभव मला परदेशात जास्त अनुभावायला मिळाला.

guru paurunima special Blog 2013

आयुष्याचा समतोल शिकवणारी गुरुमय्या- हा टप्पा सर्वात महत्वाचा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक mentor असतो. मग ती व्यक्ती तुमची घरातली असो किंवा बाहेरची पण ती तुम्हाला अदृश्य स्वरुपात सतत मार्गदर्शन करत असते. माझ्या आयुष्यात ही व्यक्ती खूप उशिरा आली पण जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तिने माझा पार बदलून टाकला. शलाका जोग, मला अमेरिकेत भेटलेली माझी मैत्रीण. एका कॅम्पिंग ट्रीप वर बनलेली हि माझी गुरुमय्या आजही माझी मोठ्ठी inspiration आहे.

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त, मी माझ्या सर्व गुरूंना त्याचं स्मरण करून माझ्या या ब्लॉग च्या निमित्ताने जाहीर नमस्कार करते. माझ्या आयुष्याचा कधीही न पुसला जाणारा अविभाज्य घटक बनल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभर.

अदिती मोहिले

(क्रिएटीव्ह डिरेक्टर zagmag.net)

 
 
 
 
 
 
IMAGE
IMAGE
IMAGE