Sign In New user? Start here.

१३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

 
 
zagmag

१३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

पुणे फिल्म फांऊडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

१३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उदघाटन सोहळा ८ जानेवारी २०१५ रोजी दुपारी ४ वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे सुरू होणार आहे. महोत्सवचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द तालवादक तौफिक कुरेशी आणि त्यांच्या वाद्यवृंदाने उदघाटन सोहळ्यास सुरूवात होईल. राज्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, इटलीचे राजदूत डॅनियल मॅनसिनी, राज्याचे अन्न- नागरी पुरवठ, संसदीय कामकाज आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट आदी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अतुलनीय योगदान देणा-या सन्मानीय व्यक्तींना दरवर्षी "पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा तर्फे विशेष पिफ विशेष गौरव सन्मान देऊन गौरविण्यात येते. यावर्षी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि जेष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांना तसेच, ज्येष्ठ गीतकार कवी- ना.धॊ महानोर् यांना पिफ विशेष गौरव सन्मान २०१५ प्रदान करण्यात येणार आहे.

संगीत क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना यावर्षीचा एस डी बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रीयेटीव्ह साऊंड अ‍ॅन्ड म्युझिक’ हा सन्मान जाहीर करण्यात येत असून महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हा सन्मान आनंदजी शहा यांना प्रदान करण्यात येणार आहे.

९ जानेवारी २०१५ पासून सिटी प्राईड-कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता, सिटी प्राईड-आर डेक्कन, आयनॉक्स -कॅंप मंगला मल्टीप्लेक्स-शिवाजी नगर, बिग सिनेमा-पिंपरी चिंचवड, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे लॉ कॉलेज व कोथरूड येथील ऑडीटोरीम येथे ८० पेक्षा जास्त देशातील, १३ विविध विभागातील २०० पेक्षा अधिक चित्रपटांचे सुमारे ३५० शोज सादर केले जातील.