Sign In New user? Start here.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 17 व्या अधिवेशनात मराठी कलाकारांची मांदिआळी

 
 
zagmag

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 17 व्या अधिवेशनात मराठी कलाकारांची मांदिआळी

लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 17 व्या अधिवेशनास शुक्रवार पासून सुरवात होणार आहे. या कार्यक्रमांसाठी मराठीतील अनेक कलाकार आवर्जून उपस्थित राहणार असून त्यांचे विविध परर्फामंन्स सादर केले जाणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात कार्यक्रमांची रेलचेल असेल. अवधूत गुप्ते, वैशाली सांमत यांचा लाईव्ह संगीत कार्यक्रमासोबत गोष्ट तशी गंमतीची‘ हे लाईट कॉमेडी नाटक, क्रीडा समालोचक हर्षा भोगले यांच्याबरोबर क्रिकेटच्या गप्पा, आनंद भाटे आणि आदित्य ओक यांची बालगंधर्वांची संगीत नाट्यचित्र गाथा, ‘लग्न पाहावे करून‘ ही कौटुंबिक सांगितिका, कृष्णधवल मराठी चित्रपटांवरील कार्यक्रम यात असेल.

याशिवाय मराठी साहित्यातील निवडक कथांचे वाचन, कथा कोलाज, द्वारकानाथ संझगिरी यांचे ‘मला भेटलेले लिजंड्‌स‘ हा कार्यक्रम, बॅंक्वेट-डिनरच्या वेळेतील ‘जादूची पेटी‘ असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम या अधिवेशनात होणार आहेत.उत्तर अमेरिकेतील कार्यक्रमांमध्ये मराठी गझल, शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर, यदाकदाचित, रंग बरसे, शास्त्रीय संगीत, रंगतरंग, मराठी सिनेमाची 100 वर्षे, खेळ मांडियेला, भाव तेथे देव-एक कीर्तन प्रवास, वाटेवरच्या सावल्या, रारंगढांग, उभ्या उभ्या विनोद असे अमेरिकेतील निरनिराळ्या ठिकाणचे कलाकार सादर करणारे कार्यक्रम आहेत.