Sign In New user? Start here.

 
 
zagmag

गोवा लघुपट महोत्सव १७ सप्टेंबरपासून

नवोदीत लघुपट निर्माते आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे १७ आणि १८ सप्टेंबर रोजी पहिला गोवा लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी येथील एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा येथे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ज्येष्ठ निर्माते दामोदर नाईक यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. इंडियन मोशन पिचर्स प्रॉड्य़ूसर्स असोसिएशनचे संचालक विकास पाटील, निर्माते अनिल काकडे, मेघराज राजभोसले, वैभव जोशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.

महोत्सवामध्ये दोन दिवसात दहा देशातील ७० लघुपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये शल्य, लिंगभेद, ब्रेकअप आणि चेडम या गोव्यातील चार लघुपटांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना विविध दहा विभागामध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. महोत्सव सर्वासाठी मोफत खुला राहणार आहे