Sign In New user? Start here.

 
 
zagmag

आजपासून सुरू होणार दुसरा संजोग संगीत महोत्सव

संजोग म्युझिकल एज्युलर्न फौडेशनच्या वतीने येत्या १६ व १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दुस-या संजोग संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे आयोजक व तबला वादक शंकर कुचेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा महोत्सव त्यांचे वडील आणि गुरू कै.पं.संजोग कुचेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो. शंकर कुचेकर हे दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक शास्त्रीय संगीत व वादनाचे कार्यक्रम अयोजित करतात. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत उस्ताद उस्मानखान साहेब, उस्ताद शाहीद परवेज, उस्ताद फैयाज हुसेनखान, गझल गायक अन्वर कुरेशी , संगीतकार कै. राम कदम, उस्ताद अक्रमखान, कथक नर्तक राजेंद्र गंगाणी, पखावज वादक फतेहसिह गंगाणी, पं धनंजय दैठणकर असे अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले आहेत.

दुस-या संजोग संगीत महोत्सवामध्येसुध्दा शास्त्रीय़ संगीत, नृत्य आणि वादन यांचा सुरेख मिलाफ पहावयास मिळणार आहे. परंपरेनुसार कलाकारांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादनाने महोत्सवाचे उदघाटन केले जाणार असून सुरूवात संजय गरूड यांच्या गायनाने केली जाईल. त्यांना शंकर कुचेकर (तबला) तर संपदा वाळवेकर (हार्मोनिअम) साथ करतील. त्यानंतर पुरबयन चटर्जी सतारवादन करतील तर अजरारा घराण्याचे उस्ताद अक्रम खान तबला वादन सादर करतील.

महोत्सवाच्या दुस-या दिवशीची सुरूवात मिलिंद तुळणकर यांच्या जलतरंग वादनाने केली जाणार असून त्यांना शंकर कुचेकर तबल्यावर साथ करतील. त्यानंतर उस्ताद अक्रम खान यांचे तबला वादन होणार असून त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम)साथ करतील. महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ कथ्थक नृत्य विशारद पं.बिरजू महाराज यांचे सुपुत्र दीपक महाराज यांच्या कथ्थक नृत्याने केला जाणार आहे. त्यांना प्रांशु चतुरलाल (तबला साथ करतील)