Sign In New user? Start here.

 
 
zagmag

५२ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर

५२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी अंतिम फेरीकरिता तीन नामांकने तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘नागरिक’, लोकमान्य-एक युगपुरुष’, ‘ख्वाडा’, हॅपी जर्नी’, ‘एक हजाराची नोट’, सुराज्य’, ‘सलाम’, ‘रमा माधव’, ‘पोस्टर बॉईज’ या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. त्यापौकी पाच चित्रपट अंतिम फेरीत पुरस्कार प्राप्त ठरतील. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता ‘काकण’, दुसरी गोष्ट’, आणि ‘ख्वाडा’ या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी ‘पोस्टर बॉईज’, ‘नागरिक’, आणि ‘ख्वाडा’ यांचे नामांकन करण्यात आले आहे. त्यापौकी प्रत्येकी एक चित्रपट पुरस्कारयोग्य असेल.

दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपौकी एकूण ५४ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या १५ तज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले.

प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून दिलीप ठाकूर, प्रदीप भिडे, विजया धुमाळे, मनोहर रणपिसे, माया जाधव, मिलींद जोशी, विवेक लागू, नरेंद्र कोंद्रा, उदयसिंग मोहिते, मनोहर कुंटे, अपर्णा गुराम, शरद सावंत, अशोक सटम, मेघश्याम वरळीकर आणि मर्मबंधा गव्हाणे यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारां व्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या पाच तज्ञ परीक्षक मंडळाकडून संबधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार दि. ३० एप्रिल २०१५ रोजी पुणे येथे चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

अंतिम घोषित पारितोषिके-तांत्रिक विभाग व बालकलाकार

उत्कृष्ट कला दिग्दर्शन- तेजस मोडक, प्रशांत बिडकर आणि अजय शर्मा (हॅपी जर्नी),

उत्कृष्ट छायालेखन-देवेंद्र गोलतकर (नागरिक)

उत्कृष्ट संकलन-जयंत जठार (हॅपी जर्नी)

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण-प्रमोद थॉमस (हॅपी जर्नी)

उत्कृष्ट वेशभूषा-भाऊसाहेब शिंदे (ख्वाडा)

उत्कृष्ट रंगभूषा-राजू अंबुलकर (ख्वाडा)

उत्कृष्ट जाहिरात-हिमांशु नंदा आणि राहुल नंदा (दुसरी गोष्ट)

उत्कृष्ट बालकलाकार-आशुतोष गायकवाड (काकण)

नामनिर्देशन

सर्वोत्कृष्ट कथा- मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी),सचिन कुंडलकर (हॅपी जर्नी),सौरभ भावे (सुराज्य)

उत्कृष्ट पटकथा- मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी),मृणाल कुलकर्णी आणि मनस्विनी लता रवींद्र (रमा माधव),किरण यज्ञोपवीत (एलिझाबेथ एकादशी)

उत्कृष्ट संगीत- परीक्षित भातखंडे (धनगरवाडा),आनंद मोडक (एलिझाबेथ एकादशी),अजय अतुल (लय भारी)

उत्कृष्ट पार्श्वगायक – रोहित राऊत (कँडल मार्च),अजय गोगावले (लय भारी),आदर्श शिंदे (धनगरवाडा),

उत्कृष्ट पार्श्वगायिका- मधुरा दातार (रमा माधव),शाल्मली खोलगडे (हॅपी जर्नी),बेला शेंडे (गुरुपोर्णिमा)

उत्कृष्ट अभिनेता- सचिन खेडेकर (नागरिक), सुबोध भावे (लोकमान्य-एक युगपुरुष),वैभव तत्ववादी (सुराज्य)

उत्कृष्ट अभिनेत्री- प्रिया बापट (हॅपी जर्नी),सई ताम्हणकर (प्यार वाली लव्ह स्टोरी),तेजस्विनी पंडित (कँडल मार्च).

विशेष अभिनेता- ह्रषिकेश जोशी (पोस्टर बॉईज),उपेन्द्र लिमये (प्यार वाली लव्ह स्टोरी),आनंद इंगळे (दुसरी गोष्ट).

विशेष अभिनेत्री- उर्मिला कानेटकर (प्यार वाली लव्ह स्टोरी),स्मिता तांबे (कँडल मार्च),उषा नाईक (एक हजाराची नोट)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री- सुहास परांजपे (पोस्टर बॉईज),वर्षा उसगावकर (हुतुतू),नेहा पेंडसे (हुतुतू).

उत्कृष्ट विनोदी अभिनेता-दिलीप प्रभावळकर (पोस्टर बॉईज),अशोक सराफ (हुतुतू),मकरंद अनासपुरे (चुक भूल द्यावी घ्यावी).

सहायक अभिनेता-पुष्कर श्रोत्री (सिटिझन),संदीप पाठक (एक हजाराची नोट),अमोल कोल्हे (रमा जाधव),

सहायक अभिनेत्री-श्रुती मराठे (रमा जाधव),वनमाला किणीकर (एलिझाबेथ एकादशी),मनवा नाईक (कँडल मार्च)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-पल्लवी पाटील (धनगरवाडा),भक्ती देसाई (आम्ही बोलतो मराठी),

पल्लवी पाटील (क्लासमेटस)