Sign In New user? Start here.

पुण्यात रंगला 'सत्व : आंतरिक बळ' एक अनोखा फॅशन शो

 
 
zagmag

पुण्यात रंगला 'सत्व : आंतरिक बळ' एक अनोखा फॅशन शो

पुण्यात एक नुकताच आनोखा फॅशन शो पार पडला. एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या तरुणींचे मनोधैर्य उंचावण्यासाठी 'रेड एफएम' ने अशा पिडीत तरुणींबरोबर नामवंत मराठी तारे-तारकांचा 'रेम्प वॉक' चा खास कार्यक्रम आयोजित केला होता .यामध्ये अ‍ॅसिड हल्याच्या बळी ठरलेल्या पण नव्याने आयुष्याची सुरवात करणा-या महिलांनी यामध्ये खास सहभाग घेतला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अशा पिडीत तरुणींच्या आंतरिक सौंदर्याबरोबरच त्यांच्या धैर्याला सलाम करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नाव 'सत्व : आंतरिक बळ' असे होते. हा कार्यक्रम 'सीझन मॉल' ( मगरपट्टा सिटी ) येथे पार पडला.

मराठीतील अनेक कलाकारांनी या फॅशन शो मध्ये आवर्जून सहभाग घेतला. जसेकी अमृता सुभाष, सौरभ गोखले, अंजिक्य देव, सोनाली कुलकर्णी, अभिजीत खांडकेकर, शुभदा खांडकेकर सहभागी झाले होते. निवेदीता यांनी खास कॉटन पासून हे कपडे तयार केले असून त्यामध्ये आयव्हरी आणि गोल्ड हेरीटेज ब्लॉक प्रिंटीगच कॉम्बीनेशन केलं होते.

'रेम्प वॉक' कार्यक्रमाची संरचना निवेदिता साबू यांनी तयार केली आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध नृत्यांगना नुपूर दैठणकर आपल्या साथीदारांसमवेत खास नृत्यरचना सादर केलॊ आणि प्रसिध्द शिल्पकार विवेक पाटील यांनी देखील शिल्प साकारल. सुप्रसिद्ध छायाचित्रकार समीर बेलवलकर यांनी आपल्या कैमेऱ्यातून या कार्यक्रमाचे चित्रण केलं आहे.