Sign In New user? Start here.

८० मराठी कलाकार अपमानास्पदरित्या विमानतळावरून परतले.

 
 
zagmag

८० मराठी कलाकार अपमानास्पदरित्या विमानतळावरून परतले.

"अजिंक्यतारा" पुरस्कार सोहळा मॉरिशस येथे होणार होता. त्यासाठी काही दिवसांपासून अनेक कलाकार याची खास तयारी करत होते. पण अचानक मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला-वहिला 'अजिंक्यतारा' पुरस्कार सोहळा तडकाफडकी रद्द करण्यात आला . आज पहाटे सुमारे ८० कलाकारांची टीम पावणेसातच्या फ्लाइटनं मॉरिशसला जाणार होती. चेक इन करण्यासाठी हे कलाकार अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पोहोचले. सिक्यूरिटी चेकींग होत असताना अचानक पावणेचार वाजता पुरस्कार सोहळाच रद्द झाल्याचा मेसेज आला. आणि ८० मराठी कलाकारांना अपमानास्पदरित्या विमानतळावरून परतावं लागलं आहे. या प्रकरामुळं मराठी कलाकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अजिंक्यतारा पुरस्कार सोहळा २१ ते २३ ऑगस्ट रोजी मॉरिशस येथे होणार आहे अशी घोषाणा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदमधे करण्यात आली होती. पूजा सावंत, अभिजीत केळकर, नेहा पेंडसे, मानसी नाईक, अमृता खानविलकर, यासारखे अनेक आघाडीचे कलाकार कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते. या सर्व कलाकारांनी आपल्या कला सादरीकरणाची जोरात तयारी केली होती. पण घडलेल्या प्रकारामुळे या कलाकारांधे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.