Sign In New user? Start here.

 
 
zagmag

आशा भोसले यांचा ८३ वा वाढदिवस

आशा भोसले यांनी ८३ वर्षात पदार्पण केल आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या सुरेल आणि शास्त्रीय़ असो वा पाश्चिमात्य शैलीच्या गाण्य़ांनी रसिक मनावर आधिराज्य गाजवत आहेत.आज आशा भोसले यांचा वाढदिवस. त्यांच्याबद्दल तुम्ही जाणताच तरिही त्यांची थोडी वेगळी माहिती खास तुमच्यासाठी. अशाताईंनी गणपतराव भोसले यांच्या सोबत लग्न केलं गणपतराव हे लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी होते. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं.

त्यामुळे मंगेशकर कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. पण आशाताईनी हा विरोध पत्करून लग्न केलं . या लग्नामुळे लतादीदी आणि आशाताई यांच्यात कटुता आली आणि अनेक वर्ष त्यांच्यात अबोला होता. गणपतराव आणि आशाताई यांना तीन मुलं झाली. सर्वात मोठ्या मुलाचं नाव हेमंत असून तो पायलट होता. त्यानंतर त्याने संगीतकार म्हणून काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वृत्तपत्रांसाठी लेखन करत होती. तर सर्वात लहान मुलगा आनंदने बिझनेस आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. आता ते आशाताईंचा व्यवसाय पाहतात. आशा भोसले यांची मुलगी वर्षाने वयाच्या 56 व्या वर्षी 2012 मध्ये आत्महत्या केली होती. गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर आशाताईंनी महान संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्यासोबत संसार थाटला. आर डी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. तर आरडी यांचंही हे दुसरं लग्न होतं.

आशा भोसले यांनी 1943 मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली. 1948 रोजी प्रदर्शित झालेल्या 'चुनरिया' या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी 'सावन आया' गाण्यासाठी आशा भोसले यांना संधी दिली .करिअरच्या सुरुवातीला गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांसारख्या मोठ्या गायिका आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशाताईंच्या वाट्यात येत असत. मास्टर नवरंग यांच्याकडे गंडाबंदा शागिर्दी पत्करून शास्त्रोक्त गाणे घटवणॆ सुरू केले. त्यावेळी फिल्मी संगीतातील स्पर्धा निकोप असली तरी सुकर मात्र नव्हती. स्वत:च्या घरी लतादीदी या शिवाय जोहराबाई, अंबालेवाली, शमशाद बेगम, मुबारक बेगम, सुरैया, गीता रॉय, पारूल घोष, उमादेवी, सुलोचना कदम, ललिता देऊळकर अशा सर्वात अशाताई एकदम लहान होत्या. आशाताईंना विशेषत: खलनायिका किंवा सहअभिनेत्रींवर चित्रीत केलेली गाणीच त्यांना मिळत असत.आशा भोसले उत्तम गायिका तर आहेतच सुगरणही आहेत. आशा भोसले यांनी 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायल्याचं आशाबाईंनी 2006 मध्ये सांगितलं होतं. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. अशाताईंना दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केल गेलं आहे. गायना बरोबरच त्यांनी 'माई' चित्रपटात अभिनय ही केला आहे. आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा बिझनेस जबरदस्त चालतो. दुबई आणि कुवेतमध्ये 'आशाज' नावाचे रेस्टॉरंट आहेत. इथे पारंपरिक उत्तर आणि पश्चिम भारतीय जेवण मिळतं. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीनमध्येही त्यांचे रेस्टॉरंट आहेत.

ब्रिटनच्या अल्टरनेटिक रॉक बॅण्डने 'ब्रिमफुल ऑफ आशा' 1997 मध्ये रिलीज केलं होतं. आशा भोसलेंना डेडीकेट केलेलं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झालं होतं. आशा भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. 1979 मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी स्वत:चं नामांकन नाकारलं, कारण नव्या गायकांना संधी मिळावी. आशा यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. आशा भोसले या पहिल्याच अशा गायिका आहेत, ज्यांना उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अलबमसाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.