Sign In New user? Start here.

मी जीवनात नेहमीच आशावादी असते : आशा भोसले

 
 
zagmag

मी जीवनात नेहमीच आशावादी असते : आशा भोसले

स्वमग्न मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. आपल्या पाल्यात काही कमी आहे म्हणून नाराज न होता उमेदीने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मी प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण केले आहे, त्यामुळे मी जीवनात आशा ठेवते, अशा भावना प्रसिध्द पार्श्‍वगायिका आशा भोसले यांनी व्यक्त केल्या.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ‘मॉरिस ऑटिजम ऍन्ड चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर’चे उद्‌घाटन आशाताईंच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. अंजली मॉरिस,डॉ. धनजंय केळकर, डॉ. सुनील गोडबोले या वेळी उपस्थित होते. आशाताई म्हणाल्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गाणे गाऊन नाव कमावले. वडीलांच्या नावाने एक रूग्णालय काढावे असे मनात होते. त्या भावनेतूनच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभे राहिले. आरोग्यसंपन्न जीवन जगता येणे, हा जन्मलेल्या प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. अधिकाधिग स्वमग्न मुलांना या केंद्राचा फायदा होईल.

डॉ. मॉरिस म्हणाल्या, स्वमग्न मुलांसाठी स्वतंत्र विभाग करण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अमेरिकेतील मॉरिस फाउंडेशनला प्रस्ताव दिला. फाउंडेशनतर्फे या विभागाला सहकार्य करण्याचे ठरवले. या वेळी सुनील गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले.