Sign In New user? Start here.

पं. शिवकुमार शर्मा आणि पं. राजन-साजन मिश्रा यांच्या मैफलीची रसिकांना पर्वणी

 
 
zagmag

पं. शिवकुमार शर्मा आणि पं. राजन-साजन मिश्रा यांच्या मैफलीची रसिकांना पर्वणी

ज्येष्ठ संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा व ज्येष्ठ गाय पंडित राजन-साजन मिश्रा स्वर्गिय सुरांमध्ये न्हण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. भारती विद्यापीठ आणि स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या वतीने दि.३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल प्रांगण, पौड रोड, कोथरूड येथे स्वरस्पंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम विनामुल्य आहे.

भारती विद्यापीठाला ५० वर्षे पूर्ण झाली असून विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यपीठाचा १० मे हा स्थापनादिन असतो. भारती विद्यापीठ एक बहुविद्याशाखीय व बहुपरिसर असे विद्यापीठ आहे.

प्रा. साठे म्हणाले, "पं शिवकुमार शर्मा आणि पं. राजन-साजन मिश्रा हे आपापल्या क्षेत्रात आणि पुणेकरांचे लाडके कलाकार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील जाणकार रसिकांना भेटायला त्यांनाही आवडते. या ज्येष्ठ कलावंतांशी यानिमित्त विद्यार्थांचीही भेट आणि संवाद साधता यावा या दृष्टिकोनातून आयोजन करण्यात आले आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर वादन आणि नंतर पंडित राजन-साजन मिश्र यांचे गायन रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे.