Sign In New user? Start here.

‘महालगोरीच्या महाखेळाचे हे कलाकार आहेत कर्णधार

 
 
zagmag

‘महालगोरीच्या महाखेळाचे हे कलाकार आहेत कर्णधार

<pआंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला लगोरी हा खेळ महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आजच्या टेक्नोसॅव्ही पिढीला मैदानी खेळांचा विसर पडला आहे आणि म्हणूनच लगोरी या खेळाला पुन्हा एकदा महालगोरीच्या निमित्ताने सर्वांच्या समोर आणण्यात येणार आहे.महालगोरी या स्पर्धेचा मूळ उद्देश गड आणि किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या NGO मदत करणे हाच आहे.

महाराष्ट्राची शान असलेले गड आणि किल्ले संवर्धनाअभावी लोप पावत चालले आहेतआणि म्हणूनचमहालगोरी स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसाची रक्कम अशा NGO ला देण्यात येईलजेणेकरूनकिल्ल्यांची साफसफाई आणि चांगली व्ययस्था ठेवण्यासाठी त्यांना मदत होईल आणि महाराष्ट्राचे वैभव जपण्याची संधी मिळेल.एशियन एंटरटेनमेंटद्वारे आयोजित करण्यात आलेल्या महालगोरी या स्पर्धेने लगोरी या खेळाला जसे ग्लॅमर मिळवून दिले आहे तसेच या खेळामुळे मराठी सिनेसृष्टीला एक वेगळाच हुरूप आला आहे. खेळ आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम असलेल्या महालगोरी स्पर्धेचामराठी चित्रपटसृष्टी तसेच मालिका आणि नाटकातील प्रसिद्ध कलाकार भाग असणार आहेत हे आपल्या सर्वांना जरी माहित असले तरी नुकतेच या स्पर्धेतील सहभागी संघांचे कर्णधार नेमण्यात आले आहेत.

गडांच्या नावावर आधारित असलेल्या प्रत्येक टीमचा कर्णधार हा खालील प्रमाणे आहे:

झुंझार राजगड - सिद्धार्थ जाधव अभेद्य अकलूज - स्मिता गोंदकर बुलंद प्रतापगड - हेमांगी कवी सरखेल सिंधुदुर्ग - संजय नार्वेकर रांगडा रायगड - सुशांत शेलार सरदार शिवनेरी - अभिजीत पानसे पावन पन्हाळा - विजय पाटकर

महालागोरीचे महासामने सप्टेंबर २०१६ च्या अखेरीस अकलूज येथे होणार असुनझी टॉकीजवर या मॅचेसचे प्रसारण होणार आहे