Sign In New user? Start here.

 
 
zagmag

पुणे फॅशन वीक 2014 मध्ये अनेक कलाकारांचा सहभाग

या हंगामात पुणे फॅशन वीक हा फारच उठावदार ठरला. ईशान्य, पुणे येथे प्रसन्न वातावरणात या तीन दिवसीय फॅशन शोचा समारोप झाला. पुणे फॅशन सप्ताहाच्या समारोपाला काही धाडसी, गतिशील आणि वेगळ्या साच्याच्या डिझायनर्सना त्यांचे उल्लेखनीय संग्रह आकर्षक मॉडेल्सद्वारा आणि यात भर म्हणजे, 19 आणि 20 डिसेंबर 2014 पासून थक्क करून टाकणार्या शोस्टॉपर्स द्वारा प्रदर्शित करण्याचा वाव मिळाला. या फॅशन शो मध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतला.

अतिशय धाडसी आणि दूरदृष्टीचे, पुणे फॅशन वीकचे, व्यवस्थापकीय संचालक - बादल साबू आणि कोरियन प्रजासत्ताकच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाशी संलग्न असलेल्या कोरिया मॉडेल असोसिएशनचे अधिकृत प्रतिनिधी - किम शी हुआन, यांच्या विचारमंथनातून निर्माण झालेल्या ‘फेस ऑफ इंडिया 2015’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

संध्याकाळच्या या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरातील - कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, डिझायनर, खरेदीदार, उद्योजक आणि या आलीशान संग्रहाच्या दर्शनाने भुरळ पडतील अशा कितीतरी लोकांची उपस्थिती होती. पुणे फॅशन वीकच्या 5व्या हंगामाविषयी बोलताना पुणे फॅशन वीकचे व्यवस्थापकीय संचालक - बादल साबू यांनी सांगितले, ‘‘पुणे फॅशन सप्ताहाचा 5वा हंगाम आयोजित करताना आम्हाला खरोखरच आनंद होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील वेचक वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पुणे फॅशन सप्ताहाची पहिली 4 वर्षे अस्ितत्व निर्माण करणे आणि प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय डिझाईनचे दर्शन घडविण्यात गेली. 5व्या हंगामात आम्ही, उद्योगातील प्रतिथयश डिझायनर्सच्या मंत्रमुग्ध करणार्या अनुभवातून, ज्यामधून पुण्याच्या फॅशन जगतात इतिहास घडणे निश्चित आहे, सृजनशीलतेमधील सर्वोच्चतेचे प्रदर्शन घडविण्यासाठी सज्ज झालो आहोत.''

पुणे फॅशन सप्ताहाच्या समारोपाला मंत्रमुग्ध करणार्या संग्रहांचा भव्य मेळावा जमला होता. संध्याकाळच्या शोचा प्रारंभ अंजली खुशलानी यांनी केला. प्रेट अ पोर्टरपासून ते पारंपारिक पोशाखापर्यंत कशाचेही डिझाईन करताना डिझायनर कला आणि कुसरीकडे अतिशय जागरूक दिसते, ‘तपशीलात परमेश्वर आहे’. अतिशय आकर्षक सोनल चौहान शोस्टॉपर म्हणून अंजलीसाठी रनवेवर शोभून दिसली.

यानंतर कलात्मक मन आणि सृजनशीलतेचा स्पर्श असलेल्या शरद राघव यांनी प्रवेश केला. शरद यांच्या डिझाईनमध्ये ‘‘विशिष्ट प्रकारची वैयक्तिक अचूकता’’ तत्व व्यक्त होते.

जॉय मित्रा यांचा संग्रह - 'दि म्युझिक रूम’, जागतिक सिनेमातील मोठे नाव सत्यजित राय यांच्या ‘जलसाघर’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रेरणेवर आधारित होता. डिझायनरने जुन्या जमान्यातील मोहिनी आधुनिक युगात आणली होती. पुरातन आणि उत्कृष्टतेला आधुनिकतेचा स्पर्श. सत्यजित राय यांच्या चित्रपटाच्या मूळ संगीताबरोबर हा संग्रह जुन्या नव्याचा मिलाफ घडवून आणेल.

1985 मध्ये स्थापित, सत्य पॉल हे आंतरराष्ट्रीय उपस्थिती असलेले भारतातील प्रमुख डिझाईन लेबल आहे. हा ब्रॅण्ड रचनेमधील कल्पकता आणि स्पष्ट रंग पटलांसाठी ख्यात आहे. भारतातील सर्वात अग्रगण्य फॅशन डिझायनर, सुनीत वर्मा यांनी सौंदर्य आणि चिरंतन शैली अजरामर केली आहे. काळजीपूर्वक कौशल्य, रचनेविषयी मजबूत संवेदनशीलता आणि शिवणकामातील संशोधन यामुळे आजच्या स्त्रीसाठी, वर्मा ब्रॅण्डमधून, कल्पनाविष्कार, मादक सुसंस्कृतपणा आणि निव्र्याज स्त्रीत्व पाझरत असते.

पुणे फॅशन सप्ताहाच्या - समारोपाच्या दिवशी ज्येष्ठ आणि ख्यातनाम डिझायनर्ससाठी जणू लाल कार्पेट अंथरले होते. या कार्यक्रमाला उच्चभ्रू ग्राहक, आमंत्रित विशेष अतिथी आणि उच्चस्तरीय खरेदीदार उपस्थित होते. पुणे फॅशन वीकच्या 5व्या हंगामात, फॅशन शोव्यतिरिक्त लोकांनी, प्रदर्शन, वाईन आणि चीज फेस्ट, ग्रेप स्टॉम्पिंग आणि बर्याच काही गोष्टींचा आनंद घेतला. पाचव्या हंगामाच्या समारोप प्रसंगी, ब्रॅण्डची धाडसी भव्यता, वैयक्तिक शैली आणि साजरीकरणाची यशस्विता ठळकपणे दिसून आली.