Sign In New user? Start here.

 
 
zagmag

''चित्रपुष्प '' मराठी चित्रपट महोत्सवात दर्जेदार चित्रपट बघण्याची पर्वणी

(नवी मुंबई ) एन के इंटरप्राईजेस प्रस्तुत अनघा इवेन्ट्स च्या वतीने दिनांक ७,८,आणि ९ ऑगस्ट २०१५ या तीन दिवसा मध्ये ''चित्रपुष्प '' मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.''चित्रपुष्प '' हा मराठी चित्रपट महोत्सव आर्काइव्ह थेटर ,लॉ कॉलेज रोड पुणे येथे प्रेक्षकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरु असणार आहे.

या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेले आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट दाखवण्यात येतील .या मध्ये अगबाई अरेच्चा२,युद्ध ,ढोल ताशे, म्हैस ,सत ना गत हे पाच प्रदर्शित झालेले आणि भविष्यात प्रदर्शित होणारे बाबांची शाळा ,७ रोशन व्हिला,वाक्या,तिचा उंबरटा,वन टू थ्री फोर हे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांच्या संदर्भातील कलाकार,दिग्दर्शक,निर्माते ,संगीतकार आणि तंत्रज्ञ यांच्या समवेत चित्रपट जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होईल. याच बरोबर बदलता मराठी सिनेमा, मराठी चित्रपटाचे मार्केटिंग,प्रसिद्धी, हाताळले जाणारे वैविध्यपुर्ण विषय अश्या अनेक विषयांवर जाणकारांचे मत चर्चा सत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांना समजतील.

"अशा प्रकारचा मराठी चित्रपट महोत्सव होत असल्याने प्रेक्षकांना एक प्रकारे मेजवाणीच ठरेल. तसेच वेगवेगळ्या विषयावर निर्माण झालेले दर्जेदार चित्रपट ते सुद्धा त्या संबधित कलाकारान समवेत प्रेक्षकांना बघता येतील. प्रेक्षक सुद्धा आपले विचार या ठिकाणी व्यक्त करू शकतात .अशी संधी ''चित्रपुष्प'' मराठी चित्रपट महोत्सव सर्वांना देत आहे."असे मत कार्यक्रमाचे प्रायोजक एन के इंटरप्राईजेस निलेश साबळे यांनी मांडलेत.

''चित्रपुष्प'' या चित्रपट महोत्सवात चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे . प्रदर्शित आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणाऱ्या अश्या दोन्ही विभागाकरिता पुरस्कार चित्रपटाना प्रदान करण्यात येईल. हा चित्रपट महोत्सव फक्त प्रेक्षकांसाठीच नव्हेच तर चित्रपटांच्या निगडीत सर्वांसाठी एक संधी आहे. असे मत चित्रपटाचे आयोजक उमेश चोधरी यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, श्री. इम्तियाझ हुसैन (जेष्ठ लेखक दिग्दर्शक ) ,श्री. रत्नकांत जगताप,अभिनेते श्री. जयवंत वाडकर,अभिनेते श्री विजय कदम अभिनेते श्री.संजय खापरे, अभिनेत्री हेमांगी कवी,श्रीनिलेश साबळे,श्री संजय भोकरे हे ''चित्रपुष्प'' चित्रपट महोत्सवाच्या मार्गदर्शक समितीवर आहेत.

या चित्रपट महोत्सवाच्या प्रवेशिका अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यालय पुणे,सिद्धांत मिडिया अँन्ड पब्लिसिटी,पर्पल चे ऑफिस , नेक्स्ट जेनरेशन न्यूज चे ऑफिस , इन ऑरबीट मॉल पुणे,ठिकाणांवरून मिळतील.