Sign In New user? Start here.

 
 
zagmag

विश्वशांती आणि समृद्धीसाठी सिनेनाट्य कलावंत करणार श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महा-अभिषेक

कलाक्षेत्राच्या समृद्धीसाठी आणि जागतिक सुख ,समृद्धी ,शांततेसाठी तमाम सिनेनाट्यकलावंतांच्या वतीने सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ला महाअभिषेक आणि महाआरती करण्यात येणार आहे . 'सलाम पुणे' या संस्थेने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . हिंदी आणि मराठी सिनेमा -नाट्य आणि दूरचित्रवाहिनी मालिकांमधील कलाकार तसेच निर्माते आणि दिग्दर्शक -तंत्रज्ञ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अशी माहिती 'सलाम पुणे' चे अध्यक्ष शरद लोणकर आणि कार्याध्यक्ष संतोष चोरडिया यांनी दिली .प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय काकडे , सौ . उषाताई काकडे आणि विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम यांना या महाभिषेक -महा आरती साठी निमंत्रित करण्यात आले आहे .

अशा प्रकारच्या महाअभिषेकाचे गेल्या वर्षी हि आयोजन करण्यात आले होते .यंदा ,हिंदी अभिनेते यशपाल शर्मा , राजपाल यादव , मुकेश तिवारी तसेच मराठीतील लीला गांधी ,मधु कांबीकर ज्योती चांदेकर , सुहासिनी देशपांडे,,जयमाला इनामदार , तेजस्विनी पंडित ,श्रुती मराठे ,मृण्मयी देशपांडे , पूजा पुरंदरे , गौरी गाडगीळ ('यलो'),वृंदा बाळ ,राधा कुलकर्णी , प्रतीक्षा जाधव ,प्रीतम कागणे ,माधवी सोमण , मोहिनी कुलकर्णी , प्रियांका पवार,गौरी कोंगे तसेच अभिनेते अशोक शिंदे,अनंत जोग ,पुष्कर श्रोत्री , संतोष जुवेकर , पुष्कर जोग , अभिजित खांडकेकर ,अनिकेत विश्वासराव,प्रवीण तरडे ,उदय टिकेकर ,हेमंत ढोमे ;उमेश दामले ,देवेंद्र भगत , गौरव घाटणेकर , संकेत मोरे ,राहुल डोंगरे , सचिन गवळी ,निरंजन नामजोशी ,संग्राम सरदेशमुख ,सिद्धेश्वर झाडबुके , योगेश वनवे ,मयुर लोणकर , संगीतकार -हर्षित अभिराज , आदी रामचंद्र , निखिल महामुनी ,अविनाश-विश्वजित दिग्दर्शक - महेश लिमये ,आदित्य इंगळे , शिव कदम ,सुनील वाईकर ,दीपक सवाखंडे ,अमोल कागणे ,निर्माता -दिग्दर्शक - अभिनेते - महेश कोठारे ,निर्माते- निलेश नवलाखा ,मेघराजराजे भोसले, विशाल गवारे , एम. के धुमाळ ,मोहन दामले ,विकास पाटील . मिलिंद लेले ,सुवदन आंग्रे,सुनील महाजन , निकिता मोघे , प्रथमेश गाढवे , वैभव जोशी , संजय ठुबे आदी मान्यवर कलावंत या महायज्ञा मध्ये सहभागी होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अशोक गोडसे , महेश सूर्यवंशी तसेच जंगली महाराज रस्त्यावरील तरवडे क्लार्कस इन यांच्या वतीने यावेळी या उपक्रमाचे आणि त्यात सहभागी होणाऱ्या कलावंतांचे स्वागत करण्यात येणार आहे.