Sign In New user? Start here.

डोह (An experience embedded in Time)

 
 
zagmag

डोह (An experience embedded in Time)

एकदा मी माझ्या एका डॉ. मैत्रीणीसोबत तिच्या क्लिनीकमध्ये बसले होते, दोघींच्या गप्पा सुरू होत्या,लंचटाइम असल्यामुळे तिकडे कोणीही नव्हतं, गप्पा मस्त रंगात आल्या होत्या, तेवढ्यात दरवाजावर बिचकत मारलेल्या थापेने आमच्या गप्पांचा भंग केला... दारात एक काॅलेजगोइंग जीन्स-कुर्ता घातलेली कावरीबावरी मुलगी उभी दिसली, थोडीसी घाबरलेली, गोंधळलेली वाटली, एक हात चेहय्रावरुन सतत फिरत होता,तर दुसय्राने हॅन्डबॅग सावरत होती,जणुकाही स्वत:लाच नुकत्याच बसलेल्या धक्क्यातुन सावरू पाहतेय....तिच्या प्रश्णांमधुन,उत्तरांमधुन तिचा उडालेला गोंधळ, भावनांचा गुंता समजत होता, स्वत:च स्वत:ला समजुन घेत असताना तीच स्वत:शीच झगडणं चालु होतं,अवस्थ ती....!! "डोह"पाहताना हे सगळ पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं.....

"डोह-An experience embedded in time " ही -अक्षय इंडीकर निर्मीत शार्टफिल्म मी काल पाहीली. आणी डोह हे नाव व तीन शॉर्टफिल्म महोत्सवाला तिच निवडल जाणं किती योग्य होतं ते पटलं...आजचा असणारा तुमचा माझा अचुक विषय मला भावला,पठडीवरुन धावणारी ट्रेन व डब्यामध्ये दाराजवळ खाबांला पकडुन उभी राहीलेली टीनएज तरूणी, किणकिणनार म्युझीक, वा-यावर भुरभुर उडणारे तिचे केस,बोटांच्या हालचाली, पडुन गेलेला पाऊस,तिचा स्वत:शीच चाललेला संवाद, धावणारी ट्रेन, समोरच नदीपात्र/डोह ही सुरूवात, यावरुन पुढचे अडाखे बांधण सोप जात असलं तरी, तरी आपण या डोहामध्ये हळुहळू उतरायला लागतो.

काल रात्री केवढां पाऊस पडला नाही, मला खुप आठवण आली तुझी ! असं बोलणारी अल्लड तरुणी व कशी म्हणंणारा तो? तिच्या umm! या उत्तरावर एकांतात खुपच कॉन्फीडण्टली, आठवतोय....! हे अँन्सर देणारा तो.मिश्कील आणी हळुवार संवाद व जबरदस्त चित्रण केलयं. (डोह बघा).. त्यांच्या संवाद व भिरभिरलेपणातुन पहील्यांदाच जवळ येत असावेत हे स्पष्ट होतं. त्यांची तंद्री अचानक दार ठोठावणारा सेल्समन भंग करतो. यानंतर एवढावेळ प्रेमाने बोलणारा तो, तिच्यावर चिडचीड करतो, अगदी तुसड्यासारखं बाथरुममध्ये जाऽऽ म्हणनं

नव्हे.... ढकलणचं ! त्याचा त्रासीक चेहरा ! तिलाही तो वेगळाच भासला असावा ?बाहेर आ बाथरुममध्ये टपटप पाण्याचा आवाज,आरश्यात तिचं स्वत:ला पाहणं! श्रृती,श्रृती म्हणत बाथरूमच दार ठोठावत जरा ओरडुनच तिला बाहेर बोलवणारा तो, मित्रांचा आलेला फोन,त्याची रिंगटोन, व त्याच्याशी Don';t worry, Nothing of that sort..म्हणतानाचा confident तो...अगोदर बाहेर जावुन वातावरणाचा अंदाज घेत,तिला बाहेर बोलवणं, दाराला कडी-कुलूप करत असतानाचा तो, तिला पुन्हा हातवारे जाऽ म्हणत असतानाचा त्याचा चेहरा, व बॉडीलॅंग्वेज पाहण्यासारखी..(मुली प्रेमात पडणंच सोडुन देतील) गोंधळलेली ती खिडकीजवळ जावुन समोरच्या झाडांच्या फांद्यात आधार शोधतेय अस वाटतं... लिफ्टमध्ये एन्टर केल्यावर त्यांच्याकडे समजल्यासारखं पाहणारा लिफ्टमन, केसांमध्ये स्वत:ला लपवु पाहणारी गोंधळलेली ही, काहीच न झाल्यासारखं वागणारा तो, प्रकर्षाने जाणवते ती सगळी त्याच्या वागण्या-बोलण्यातली तफावतच.....!

घरी जाण्यासाठी निघालेली ती रंगीबेरंगी मार्केटमध्ये हरवुन जाते, आज नव्यानेच ती सगळ पाहतेय अस वाटतं, ट्रेनमधील प्रवासात पुन्हा पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जावुन तो थरार ती अनुभवु पाहते..एकदम शांतपणे बाहेर पाहते ,मधुन मधुन फोन काॅल करणं तिची अस्वस्था,हरवलेपण सांगण्याचा प्रयत्न करतात, खडखड आवाजातही मोबाईलवर (गजरा-टाइप) गाणं लावणारा एक स्ट्रेन्जर,घरी गेल्यावर आईशी तिने केलेला कोरडा संवाद, बेडवर शांतपणे पडलेली ती, बाथरुममध्ये जावुन स्वत:ला निरखनं, माखलेलं पाऊलं, भिंतीवरच्या कलरच्या निसटत असलेल्या खपल्या, पुन्हा थरार...आई, लहान भाऊ,व मैत्रीणीसोबतचा संवाद व हे सगळे सीन आपल्यापर्यंत विषय पोहचवायला मदत करतात. फोन आल्यावर बेडरुममध्ये धावत जावुन फोन घेण्यासाठी ओतलेल्या/झटकलेल्या पर्समधुन cosmetics शिवाय काहीही बाहेर पडताना दिसत नाही....कॉलेजला गेलेल्या teenage मुलींच्या पर्समध्युन नोटबुक तर सोडाच एक कागद ही बाहेर पडु नये (जरी ती स्केडुल पहायला गेलेली असली तरी)? ही पिढी कुठे वाहवत चाललीय ? हे वास्तव सांगण्याचा लेखकाने,दिग्दर्शकाने केलेला प्रयत्न superb वाटला मला. एवढावेळ वेगळ्याच मुडमध्ये असलेली ती,त्याचा फोन येवुन गेला की, Mama आज भाजी कुठली करणारेस हे विचारते? (strange na? जणुकाही हा म्हणजे मुड फ्रेश करणारा एनर्जी ड्रिंकचं आहे)

श्रृतीच्या मनपटलावरील तरल भाव,भावनांचा उडालेला गोंधळ, puberty, शारीरीकतेवर कुठेही अगदी स्वत:शीही न झालेला संवाद, स्त्री पुरूष नातेसंबधावर भाष्य, सोशल अँटमॉस लैंगीकता व त्यात अडकत जाणारी ती....! त्याला लाभलेली दोघांच्याही उत्तम अभिनयाची साथ,जबरदस्त चित्रण, करन्ट विषय, संगीत व या सगळ्या मुद्यांवर 20 मिनीटांच्या फिल्ममध्ये अगदी कुठलाही आडपडदा न ठेवता ,भाष्य करण्याचा केलेला एक सफल प्रयत्न म्हणजे "डोह".....!

डॊह (आठवणींवर बोलण्यावर भर देणारी ती & ऐ,ऐकनां (महाराष्ट्रीयन मुलांचा पेटंट वर्ड) म्हणत जवळीकतेवर बोलणारा हा? जरुर पहावी अशी ही शॉर्टफिल्म, स्त्रियांसाठी मस्ट वॉच )

- अ‍ॅड. निर्मल यादव.