Sign In New user? Start here.

 
 
zagmag

सई आणि अंजुम चोप्राने पुण्यात एस्सेलवर्ल्डमधे घेतला वेगळा अनुभव

एस्सेलवर्ल्डचा पुण्यातील सिझन्स मॉलमध्ये शुभारंभ झाला. या पहिल्या अनोख्या फॅमिली एन्टरटेन्मेंट सेंटरचे उदघाटन भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार अंजूम चोप्रा आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. डाऊनटाऊन एस्सेलवर्ल्ड सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत चालू असेल.

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, एस्सेलवर्ल्ड हे मनोरंजन क्षेत्रातील मोठे नाव असून त्यांच्याकडून दिल्या जाणा-या दर्जेदार सेवेचा वारसा त्यांना लाभला आहे. गेली २५ वर्षे ते आपल्याला जागतिक दर्जाच्या अम्युझमेंट पार्कचा अनुभव देत आहेत.त्यांनी भारतीय जनमानसात मनोरंजनाचा ठसा उमटवला असून पुढेही याचप्रमाणे संपूर्ण मनोरंजनाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या या उपक्रमाला यश मिळेल. त्यांनी मनोरंजनाची जी संधी दिली त्याची हमी वाटते.

क्रिकेट हा क्रिडाप्रकार केवळ भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय आहे. डाऊनटाऊन एस्सेलवर्ल्डध्ये हा खेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल मला फार गर्व वाटतो. इथले ग्राफिक अप्रतिम असून येथे येणा-या पाहुण्यांना बॅटींगचा खरा अनुभव मिळणार आहे. मला खात्री आहे की इथे येऊन लोक व्हर्च्युअल बॉलर्सच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून आणि विकेट मिळवून बक्षिस जिंकण्याचाही आनंद लुटू शकतील. त्यामुळे हा खेळ खेळणे धमाल ठरणार आहे. थ्री-डी रिप्ले आणि साऊंड इफेक्ट हा सगळा माहोल ख-या क्रिकेट सामन्याचा अनुभव देणारा ठरणार आहे. असे उदगार भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी काढले.

एस्सेलवर्ल्ड वॉटर किंग्डम आणि डाऊनटाऊन एस्सेलवर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले की, आमच्यासाठी हा एक महत्वपूर्ण दिवस आहे. ते केवळ आम्ही डाऊनटाऊन एस्सेलवर्ल्डचे लॉन्च करतोय म्हणून नव्हे तर आम्ही पुण्यातीळ लोंकाना माफक दरात थराराचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याचा आनंद वाटत आहे. तीन नव्या आकर्षक पर्यायांच्या माध्यमातून पुणेकरांना पहिल्यांदा उत्तम असा आंतरराष्ट्रीय अनुभव मिळणार आहे.