Sign In New user? Start here.

 
 
zagmag

आजापसून रंगणार युरोपीयन चित्रपट महोत्सव

जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे स्थान असणा-या स्विझर्लंड, जर्मनी, इटली आणि स्पेन या चार युरोपीय देशांमधील नामवंत चित्रपट महोत्सवांमध्ये सादर झालेले उत्तमोत्तम २१ चित्रपट पुण्यात. दि.१७ एप्रिल पासून तीन दिवस पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने दाखविले जाणार आहे. या युरोपियन चित्रपट महोत्सवाचे आज दि १७ एप्रिल रोजी सायं ०५.०० वाजत सिंबॉयसेस विश्वभवन सभागृह येथे उदघाटन होत आहे. पुणे फिल्म फाऊंडेशनचे चेअरमन डॉ.जब्बार पटेल, सिंबॉयसेस सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ.विद्या येरवडॆकर, स्विझर्लंडचे मुंबईतील कौन्सिल जनरल मार्टिन बेन्झ, डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत या तीन दिवसांच्या महोत्सवाचे उदघाटन संपन्न होईल. पुणे फिल्मस फाऊंडेशनने याचे आयोजन केले आहे.

सिंबॉयसेस विश्वभवन सभागृह आणि फिल्म अ‍ॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्य़ूट ऑफ इंडिया येथे या चित्रपट महोत्सवांमधील एकूण २१ चित्रपट दाखविले जातील. या सर्व चित्रपटांना मुक्त प्रवेश आहेत. लोकार्णो चित्रपट महोत्सवातील Man who save thr world हा चित्रपट ऒपनिंग फिल्म म्हणून यावेळी दाखविला जाईल.या चारही युरोपियन महोत्सवातील यंदा गाजलेले प्रत्येकी दोन चित्रपट व निवडक लघुपट या ति दिवसात प्रदर्शित केले जातील.

भारतात असा युरोपीयन चित्रपट महोत्सव प्रथमच दिल्ली व पुण्यात होत आहे. यामध्ये बर्लिन (जर्मनी) महोत्सवातील दोन चित्रपट व दोन लघुपट, लोकार्णो चित्रपट महोत्सवातील दोन चित्रपट व तीन लघुपट, रोम चित्रपट महोत्सवातील दोन चित्रपट व चार लघुपट आणि चार लघुपट आणि व्हालाडोलीड चित्रपर्ट महोत्सवातील प्रत्येकी दोन चित्रपट व लघुपट असे एकूण २१ चित्रपट प्रदर्शित केले जातील. १८ वर्षावरील सर्वांना हा महोत्सव विनामूल्य आहे. या युरोपीय चित्रपट महोत्सवाच्या तीन दिवसांच्या विनामूल्य प्रवेशिका मिळण्यासाठी www.piffindia.com या संकेतस्थळ संपर्क साधावा.