Sign In New user? Start here.

गानसरस्वती महोत्सव रंगणार ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान

 
 
zagmag

गानसरस्वती महोत्सव रंगणार ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान

मराठी रंगभूमी, तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात सातत्यपूर्ण संशोधन व उत्तेजनासाठी कार्यरत असलेल्या "नाट्यसंपदा प्रतिष्ठान तर्फे याही वर्षी गानसरस्वती महोत्सवा चे आयोजन करण्यात येत आहे. पद्मविभूषण "गानसरस्वती" किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देणे, हाही या महोत्सवाच्या आयोजनामागचा एक हेतू आहे. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून यानिमित्ताने नामवंत ज्येष्ठ कलाकारांबरोबरच उद्योन्मुख कलाकारांचा अविष्कार अनुभवण्याची अनोखी संधी पुणेकर संगीतरसिकांना मिळणार आहे.

यंदाचा गानसरस्वती महोत्सव येत्या ६ ते ८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यातील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात येणार आहे. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे संगीतातील विविध कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेकविध उपक्रम राबविले जातात. अनेक नामवंत कलाकारांसह स्वत: किशोरी आमोणकर यांच्या सहभागाने रंगलेल्या गेल्या दोन वर्षी झालेल्या महोत्सवास संगीतरसिकांनी प्रंचड प्रतिसाद दिला होता.पहिल्या दिवशी म्हणजे ६ फेब्रुवारी रोजी सायकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कलाविष्कार सादर केले जातील. महोत्सवाचा प्रारंभ प्रख्यात गायिका नंदिनी बेडेकर यांच्या गायनाने होणार असून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या त्या शिष्या आहेत. नंदिनी यांच्या गायनानंतर राकेश चौरसिया यांचे बासरीवादन होणार आहे. विशेष म्हणजे प्रसिध्द तबलावादक विजय घाटे व भावानीशंकर (पखवाज) यांच्या संथीमुळे हा त्रिवेणी कार्यक्रम रसिकांना निराळा आनंद देणारा ठरेल या दिवसाची सांगता आनंद गंधर्व म्हणून प्रसिध्द पावलेले गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होईल.

महोत्सवाचा दुस-या दिवशीची म्हणजे ७ फेब्रुवारीची सुरूवात पं. कुमार गंधर्व यांचे नातू, भुवनेश कोमकली यांच्या गायनाने होणार आहे. या नंतर नावजलेले आणि मुख्यत्वे तरूण वर्गाला आपल्या वादनाने मंत्रमुग्ध करणा-या निलाद्री कुमार यांचे सतार वादन हॊणार आहे. या वादनापाठोपाठ शास्त्रीय संगीतातील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडी-देशपांडे यांचे गायन होणार आहे.या महोत्सवाच्या शेवटच्या व तिस-या दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी व सायंकाळी अशी दोन सत्रे होतील. सकाळचे सत्र सकाळी ९.०० वाजता सुरू होईल ज्याच्या प्रारंभ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक दिनकर पणशीकर यांच्या गायनाने होणार आहे. दिनकर पणशीकर हे निवृत्तीबुवा सरनाईक यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत. यांच्या पाठोपाठ ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता मालिनी राजूरकर यांचे गायन होईल. टप्पा गायन ही त्यांची खासियत असून त्यांच्या गायनाने सकाळच्या सत्राची सांगता होईल.या दिवशीचे सायंकाळचे सत्र शास्त्रीय संगीत गायिका मंजिरी असनारे-केळकर यांच्या गायनाने सुरू होणार आहे. मंजिरी या संगीत अकादमीतर्फे देण्यात येणा-या पहिल्या "बिस्मिल्ला खान युवा संगीत पुरस्कारा" च्या मानकरी ठरल्या होत्या. यांच्या गायनानंतर गायक रशिद खान यांच्य गायनाने या वर्षीच्या महोत्सवाची सांगता होणार आहे.