Sign In New user? Start here.

तळजाई टेकडी होणार हिरवीगार

 
 
zagmag

तळजाई टेकडी होणार हिरवीगार

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पुण्यातील तळजाई टेकडीवर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी एकत्र येऊन 'वृक्षारोपण करून' पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत केली आहे. ही लावलेली झाले पुणे महानगर पालिका जगवणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळावर तोडगा म्हणून, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, अभिनेता योगेश सुपेकर, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य बाबा पाटील, डॉ. शंतनूजगदाळे आणि माध्यम तज्ञ विनोद सातव यांनी हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला होता. त्यांनी सिनेकलाकारांना, प्रसार माध्यमांना आणि सुज्ञ पुणेकरांना वृक्षारोपणासाठी आवाहन केले होते आणि त्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

पुण्यातील साहित्य, कला, खेळ आणि राजकारण इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि इतर सुज्ञ पुणेकरांनीदेखील या कार्यक्रमाला आवर्जून वर्णी लावलीहोती. माननीय महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप, तसेच मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक द. मा. मिरासदार आणि लेखक किरण यज्ञोपवीत, कवी-अभिनेता संदीप खरे, कवी वैभव जोशी शिवाय प्रवीण तरडे, विनोद खेडकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुरेश विश्वकर्मा, शर्वरी जमेनिस, प्राजक्ता माळी, अश्विनी एकबोटे, देवेंद्र गायकवाड, रोहन मंकणी, शिवराज वाळवेकर, श्रीराम पेंडसे, आशितोष वाडेकर, चेतन चावडा हे कलाकार आणि संगीतकार विश्वजीत जोशी, दिग्दर्शक डॉ अंबरीश दरक, नितीन चव्हाण, अजय नाईक, बंटी-प्रशांत, अड. रमेश परदेशी इत्यादी व्यक्तींनी वड, कडूनिंब, पिंपळ यांसारखे मोठे वृक्ष लावून तळजाई टेकडी हिरवीगार केली आहे.

झाडं लावल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी असते ती झाडं जगवण्याची! ही जबाबदारी घेतली आहे पुणे महानगर पालिकेच्यावृक्ष संवर्धन समितीने. महापौर प्रशांत जगताप आणि नगरसेवक सुभाष जगताप यांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि पुणे महानगर पालिका या झाडांची निगराणी आणि जोपासना करेल हे आश्वासनही दिले आहे. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे असे उपक्रम पुण्यात वारंवार घडतील आणि पुणे लवकरच हिरवेगार होईल.