Sign In New user? Start here.

डॉ गिरीश ऒक यांच "कहानी में ट्विस्ट" नाटक अमेरिकेत

zagmag

 
 
zagmag

डॉ गिरीश ऒक यांच "कहानी में ट्विस्ट" नाटक अमेरिकेत

डॉ गिरीश ऒक यांच कहानी में ट्विस्ट या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत सादर केलं जाणार आहे. या नाटकात डॉ गिरीश ऒक, सौरभ गोखले आणि प्राजक्ता दातार या कलाकारांचा समावेश आहे. गिरीश ऒक एका महिलेच्या व्यक्तिरेखेत असून सौरभ गोखले लेखकाच्या भूमिकेत आहे. हे नाटक सस्पेन्स थ्रिलर आहे. या नाटकाचे तीन प्रयोग होणार आहे डलास (Dallas) - 16 ऑगस्ट, शिकागो (Chicago) - 22nd ऑगस्ट , अटलांटा (Atlanta) - 14th ऑगस्ट.

या नाटकाचे आयोजन निधी उभारण्यासाठी करण्यासाठी येत आहे. आजच्या धका धकीच्या जीवनात मन:शाती किंवा मानसिक समाधन कुठेतरी हरवत चालले आहे. खुपदा आपली चिड-चिड होते. कारण काय तर आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही हो ना? मग डॉ पारनेरकत लाईफ मॅनेजमेंट मधे हेच शिकवल जात. मन:शाती किंवा हरवत चाललेल मानसिक समाधान आपल्याला मनासारख कशाप्रकारे राहता येईल अशा सर्व गोष्टीचं ज्ञान इथे दिल जातं. डॉ पारनेरकर यांचे अनुयायी अमेरिकेतही कार्यरत आहेत. नॉर्थ अमेरिकेतही हे कार्य अविरतपणे चालू आहे. पण कोणतही कार्य करताना ते काम एका निश्चित ठिकाणी होत असेल तर त्या चांगल्या कामबद्दलचा प्रसार करणं सोप जातं. यामुळे अटलांटा इथे या सेंटरच निर्माण केलं जाणार आहे. त्यासाठी निधी उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. डॉ. पारनेरकर लाईफ मॅनेजमेंट आणि अमेरिकेतील काही मराठी मंडळ एकत्र येउन एका चांगल्या कामासाठी निधी उभारण्यासाठी "कहानी मे ट्विस्ट" या नाटकाचं आयोजन करण्यात येत आहे.