Sign In New user? Start here.

प्रत्येक राज्यात हवे चित्रपट संग्रहालय: कमल हसन

 
 
zagmag

प्रत्येक राज्यात हवे चित्रपट संग्रहालय: कमल हसन

पी.के नायर यांच्यामुळॆच मी आज चित्रपटसृष्टीत वेगळ स्थान निर्माण करू शकलो आहे. चित्रपटांचे जतन व्हायला हवे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. चित्रपट जतन व संवर्धनासाठी केंद्र सरकारने संस्था निर्माण करावी व त्यास नायर यांचे नाव देण्यात यावे अशी सूचना ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी रविवारी केली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्ह आणि फिल्म हेरिटेज फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप ते बोलत होते. या प्रसंगी केद्रीय़ माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव सुनील अरोरा, ख्रिस्तोफर डुपेन, शिवेंद्रसिंग डुंगारपूर आणि एनएफआयचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते.

माहिती व प्रसारण मंत्रालय आणि एनएफआयने नॅशनल फिल्म हेरीटेज मिशनमध्ये लोंकाना सहभागी करून एनएफाआयची दालने युवा पिढीला अभ्यास आणि संशोधनासाठी खुली करावीत. ज्ञान स्वत:पुरते सीमित न ठेवता अधिकाधिक लोकांना देण्याचा प्रयत्न करायला हवा, पी के नायर यांच्याविषयी कृतार्थता व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे. चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आमच्यासारखे अनेक दिग्दर्शक घडविले. चित्रपट जतन आणि संवर्धनाचे महत्व लक्षात घेऊन मी चेन्नईमध्ये चित्रपट संग्रहालय स्थापन करण्याचा प्रयत्नही केला, मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते शक्य झाले नाही.मी केलेल्या कामाकडे वळून पाहताना मला अवघडल्यासारखे होते. मी याही पेक्षा चांगल काम करू शकलो असतो असा विचार मनात येतो. पण रसिकांनी वेळोवेळी मला स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिले, याबद्दल मी त्यांचा कायमचा रूणी आहे.

हेरीटेज मिशनला ६०० कोटी "नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनच्या कामाला सुरूवात झाली आहे. या मिशनसाठी पाच वर्षाच्या कालवधीकरिता केंद्राकडून ५९७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्यात २० कोटी रूपये मंजूर झाले असून, येत्या काही दिवसात हा निधी एनएफआयला मिळेल. तसेच दोन वर्षातून एकदा देशाच्या विविध भागात ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा भरविण्याचा विचार आहे, अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली.