Sign In New user? Start here.

 
 
zagmag

लय, अदा व नृत्याच्या अविष्काराने रंगला लावणी महोत्सव

लय, अदा, नृत्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या पारंपारिक तसेच ठसकेबाज लावण्या... रसिकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून दिलेली भरभरून दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लावणी महोत्सव श्री गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत या ‘महालावणी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. पुरूषांप्रमाणॆच महिलांची उपस्थिती आणि त्यांनी टाळ्या, शिट्या व वन्समोअरने कलावंतांना दिलेली दाद याने रंगमंच दणाणून सोडले.

या रावजी... बसा भावजी, कारभारी दमानं... आबा जरा सरकून बसा.., शिटी वाजली.., लाडाची ग लाडाची, मी कैरी पाडाची..., सोडा राया सोडा हा नादखुळा ..., जरा थेंबानं..., तुमच्या पुढ्यात कुटते मी, ज्वानीचा मसाला...यावं यावं दिलाच्या दिलवरा...यांसारख्या जुन्या आणि नव्या लावण्याचे बतावणीसह सादरीकरण तसेच कलावंतांची थिरकलेली पाऊले आणि त्यांच्या लय, असाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. टाळ्या, शिट्या आणि वन्समोअरने प्रेक्षकांनी रंगमंच डोक्यावर घेतले. विविध लावणि ग्रुपच्या एकाच ठिकाणी सादर झालेल्या या दिलखेच अदाकारीच्या अविष्काराने रसिकांना घायाळ केले.

या महालावणी महोत्सवात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्य नटरंगी नार, सीमा पोटे व नीलम यांचा ज्वानीचं पाखरू, नम्रता महामुनकर व राधिका पाटील यांच्या अप्सरा सोनम जाधव व मिताली ठाणेकर यांच्या छत्तीस नखरेवाली, पूनम कुडाळकर व पूजा पाटील, शिवानी भाटे व माया शर्मा ग्रुपने सहभाग घेतला..