Sign In New user? Start here.

 
 
zagmag

मराठी कलाकारांची देशसेवा

१५ ऑगस्टच्या दिवशी आपल देशप्रेम उफाळून येत. याच दिवशी देशाबद्दलच प्रेम जरा जास्तच उतू जात नाही का? पण आपण या समाज्याच देण लागतो हे आपण विसरून जातो. पण असे काही कलाकार आहेत ते आपल देशाबद्दलच कर्तव्य जाणून आहेत. आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर नसेल ही पण खारीचा वाटा ही तितकाच महत्वाचा असतो नाही का. काही दिवसापूर्वी बीड जिल्हातील १२२ आत्महत्याग्रस्त शेतक-यानां आर्थिक मदत नाना पाटेकर : १५ लाख, मकरंद अनासपुरे - २ लाख ,सयाजी शिंदे - १ लाख, रेणुका शहाणे- १ लाख, दिलीप प्रभावळकर - ३०,०००, पुरूषोत्तम बेर्डे - १०,०००, जीतेंद्र जोशी- १५००० या कलाकारांनी केली. या आर्थिक मदतीने शेतक-यांच दु:ख नाहीसे होईल असेही नाही पण ते कमी होण्यास मदत मात्र नक्कीच होईल.

याच बरोबर काही दिवसांपूर्वी मराठी शाळां सावरण्यासाठी ५ मराठी कलारांनी पुढाकार घेतला होता आणि ते काम अजूनही सुरू आहे .आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुबोध भावे, अमोल कोल्हे आणि दिगंबर नाईक यांनी कुर्ला झोपडपट्टी मधील हरिहर भागामधील संत सेवा मंडळाची ‘प्रबोधन कुर्ला ही शाळा दत्तक घेतली आहे. रवि जाधव , विजू माने हे चित्रपट निर्माते दर वर्षी रंगपंचमी मतीमंद मुलांनसोबत साजरी करतात. इथे या मुलांनमधे ही मंडळी अगदी लहान मुलं होऊन जातात. त्याच बरोबर अतुल कुलकर्णी आणि त्यांची बहीण एक एनजीऒ चालवतात. जिथे मोठ्या लोंकाना साक्षरतेचे धडे दिले जातात. पु.ल देशपांडे यांनी ही अनेक शाळांना आणि संस्थांना आर्थिक मदत केली आहे पण जेव्हा ते मदत करत तेव्हा त्यांची अट असे की माझं नाव कधीच पुढे नाही यायला पाहिजे. गाजा वाजा हो किंवा ना हो मदत करणं महत्वाच. अशाच प्रकारची अनेक छोटी छोटी आणि महत्वाची कामं ही कलाकार करत असतात. ही ख-या अर्थाने देशसेवा नाहीका?