Sign In New user? Start here.

 
 
zagmag

सेलिब्रेटी फिटनेस

फिटनेस हा एक असा विषय आहे की आजकल सगळेच त्याबाबत जास्त जागृक असतात. मग ही जागृकता आपल्या कलाकारांमधे तर असणारच जाणून घेउया हे कलाकार स्वत:च्या फिटनेस साठी काय करतात.

फ्रेश होण्याचा उत्तम उपाय- - अमृता खानविलकर

मला आवडणाऱ्या मोजक्या गोष्टींमध्ये व्यायाम ही एक महत्वाची आणि आवडती गोष्ट आहे. त्यासोबत पोहण्याचा व्यायाम देखील करते. रोज तासन तास चालणाऱ्या शुटींगमध्ये शारीरिक उर्जा आणि स्ट्रेन्थ टिकवून ठेवण्यासाठी विटामीन युक्त आहार घेते, खुप पाणी पिते आणि संध्याकाळी ७ नंतर काहीही खाणं टाळते. नच बलिये शोमुळे माझं पाच किलो वजन कमी झालं त्यामुळे मी डान्ससुद्धा प्रीफर करते. फिगर मेंटेन करण्याच्या बाबतीत बरेच जण कॉन्शियस झाले आहेत. मात्र त्यासाठी कोणताही स्ट्रेस किंवा जास्त वर्कआउट करण्याची गरज नाही. हो, मात्र निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. मी स्वतः गेल्या दोन वर्षांपासून त्यामुळे मिळणारा तजेलदारपणा आणि कामातील उत्साह अनुभवतेय. जेव्हा आपण आतून उत्साही आणि फ्रेश असतो तेव्हा ते आपल्या चेहऱ्यावर देखील झळकत.

फिटनेसचा बागलबुआ नको - गश्मीर महाजनी

फिटनेससाठी तसे मी दिवसातले ४५ मिनिटे खर्च करतो. ण मी स्वतःचे बेसिक फिटनेस गेली ८-१० वर्ष पाळत असल्यामुळे व्यायामाशिवाय माझा दिवस अपूर्णच आहे. आजकाल फिटनेसच्या बाबतीत लोक बरेच सजग झाले आहेत मात्र त्यात भंपकपणा फार वाटतो. कार्ब डाएट किवा झिरो कार्ब डाएट सारखे फंडे लोक करतात, मला त्यांना असं सांगावसं वाटतं की तसं काही करून काहीही उपयोग नाही. पुढे जाऊन त्याचा शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय अशाप्रकारचे सल्ले देणा-यांचा देखील काही प्रमाणात स्वार्थ दडलेला असतो. कदाचित तुम्हाला लवकर रिझल्ट दाखवण्यासाठी तसे करायला सांगतात. हेच पहा कॅरी ऑन मराठा सिनेमामध्ये मी करत असलेली मार्तंड ही भूमिका पहिली तर नक्की वाटेल त्यासाठी मी काही विशेष मेहनत घेतली असेल. मात्र तसं अजिबात नाही माझ्या रोजच्या व्यायाम करण्याच्या पद्धतीने मार्तंडच्या भूमिकेत मी चपलख बसलो. मी आजही घरात जे काही बनतं ते सगळ खातो डाळ, भात, आमटी, भाजी आणि पोळी खातो. डाएटच्या नावाखाली भात किंवा तेलकट पदार्थ खायचे नाही किंवा उकडलेल्या पदार्थांचे सेवन करायचे अशी पथ्य मी पाळत नाही. उलट सर्व प्रकारचा आहार घेऊनचं मी फिट आहे. आहारात हाय प्रोटीन पदार्थ नक्की असावेत, आणि त्यासाठी मी अंडी, ब्रोकोली किंवा चिकन, सी फूड हे पदार्थ मी खातो. त्यातून मिळणारे प्रोटीन्स मला दिवसभारासाठी उर्जा देतात. त्यामुळे फिटनेसचा बागलबुआ नको. आपल्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात नियमित डाएट फॉलो करता येंत नाही अशी सर्व सामन्याची ओरड असते मात्र आपण सध्या आणो सोप्या गोष्टी नक्कीच करू शकतो. घरचे जेवण, रात्री १० नंतर खाणं टाळणे. मुळात रात्री ९-१० नंतर आपली पचन शक्ती थकलेली असते, त्यामुळे त्यानंतर तुम्ही जे काही खाल त्याच चरबीत रुपांतर होतं म्हणून शक्यतो जितक्या लवकर जेवता येईल तितक्या लवकर जेवावे.

तज्ञांच्याच सल्ल्याने आहारविषयक निर्णय घ्या (गायिका निर्माती - नेहा राजपाल ) मला नेहमीप्रयोगशील राहायला आवडतं वेगवेगळी गाणी असो निर्माती होण्याचा निर्णय मात्र आरोग्याच्या बाबतीत मी कोणतेही प्रयोग करत नाही. त्यासाठी मी स्वतः रोजच्या व्यायामाची आणि चालण्याची सवय लावून घेतली आहे. सकाळी उठल्यावर चहा कॉफी ऐवजी मी एक वेलची केळं खाते त्यामुळे संपूर्ण दिवसासाठी मला पुरेशी उर्जा मिळते. रात्री ८ नंतर जेवण टाळते. रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे घरच्यांसोबत वेळ देणं कठीण होतं त्यामुळे कधीही न चुकता मी स्वतः मुलीला शाळेत सोडायला जाते. जेणे करून तिच्यासोबत काही काळ घालवल्याचा आनंद मिळतो. लट्ठपणा किंवा बारीकपणा हे मुळात व्यक्तीच्या बीएमआय (बॉडी-मास-इंडेक्स) वर आधारित एक डॉक्टर म्हणून मला मनापसून असं वाटतं उपाशी राहून डाएट अथवा दमेपर्यंत जिममध्ये घाम गळू नये. त्याशिवाय ऐकीव गोष्टीवर विश्वास न ठेवता तज्ञांच्याच सल्ल्याने आहारविषयक निर्णय घ्या. मी स्वतः कधी जीममध्ये जात नाही. सर्व प्रकारचं अन्न खाते मात्र दर दोन तासाने. मांसाहारी जेवण आवडत असल्यामुळे त्यातून मला जास्त प्रोटीन्स मिळतात आणि ३ ते ४ तास परत भूक लागत नाही. नेहा राजपाल प्रोडक्शन हाउसतर्फे पहिल्या वहिल्या चित्रपटाची निर्मिती करताना फार धावपळ, तणाव गोंधळ होण्याची शक्यता होती पण काहीच झालं माझी टीम माझ्यासोबत होती नुकतंच सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु झाले आहे.

नाच्यूरोपँथी मला खूप फायद्याची ठरते (गायिका योगिता चितळे)

गायनाच्या क्षेत्रात असल्यामुळे घशाची, स्वर यंत्र अवयवांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी मी गेल्या २ वर्षांपासून नाच्यूरोपँथीचा अवलंब केला आहे. त्याचा फायदा देखील मी अनुभवतेय. या प्रकारात भाज्या, भाज्यांचे सूप, आणि भाकरी या मोजक्या गोष्टींचा समावेश असतो. मी स्वतः शाकाहारी असल्याने असं डाएट करताना मला अजिबात त्रास झाला नाही. रोजचा पाऊण योगा त्यात अग्नीसार आणि गुणीयानबंध ही विशेष योगासनं असतात ज्यामुळे घशाचा व्यवस्थित व्यायाम होतो. त्याचबरोबर रोजची नियमित झोप असतेच. गाण्याच्या कार्यक्रमानिमित्ताने जेव्हा कधी बाहेरगावी जाणं होतं तेव्हा सगळ्याच गोष्टी काटेकोरपणे पाळता येतात असं नाही मात्र त्यातल्या त्यात हळद-मीठ-पाण्याच्या गुळण्या किंवा आसनं नियमित करते. गुरुयोगच्या माध्यमातून येत्या २५ जुलै रोजी सिंगापूर मध्ये होणाऱ्या 'कसे गीत झाले' या गाण्याच्या कार्यक्रमासाठी मी आणि गुरु ठाकूर सातत्याने तयारी करतोय. त्यामुळे तब्येत सांभाळून काम करण्यावर आमचा जास्त भर आहे.