Sign In New user? Start here.

 
 
zagmag

सिंगापूर मध्ये रंगणार मराठी चित्रपट महोत्सव

मराठी संस्कृती, कला नाट्य व चित्रपटक्षेत्राला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने गारवा ग्रुप व कूल होम्सच्या सहकार्यातून सिंगापूर येथे मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे. २६ सप्टेंबर पासून ‘झेप मराठी मातीची; या नावाने या महोत्सवाला सुरवात होईल अशी माहिती अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे , निर्माते अमेय खोपेकर, अभिनेत्री मनवा नाईक आदी कलाकार उपस्थित होते. या महोत्सवामध्ये ‘रेगे’, पोरबाजार आणि लय भारी हे चित्रपट दाखवण्यात येतील.

महेश मांजरेकर म्हणाले की, अशा महोत्सवांतून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नावलौकीक मिळण्याचे काम होत आहे. इराणी दिग्दर्शक माजीद यांच्या चित्रपटांची जगभरात चर्चा होत असते. तशी चर्चा मराठी चित्रपटांची झाली पाहीजे. परदेशात राहणा-या मराठी भाषिकांना मराठी चित्रपट पाहता येत नाहीत, त्यांच्यासाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणी ठरणार आहे. पहिल्यांदा सिंगापूर आणि त्यानंतर अन्य देशांमध्ये हा महोत्सव भरवण्यात येईल. आगामी काळात मराठी चित्रपट परदेशात अधिक व्यवसाय करतील, असे चित्र आहे.