Sign In New user? Start here.

पहिल्यांदाच 'क्रुझ' वर रंगणार मराठी चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळा!!

 
 
zagmag

पहिल्यांदाच 'क्रुझ' वर रंगणार मराठी चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळा!!

'इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल अवार्ड्स' (आयएमएफएफए) हा एक संकलनात्मक चित्रपट महोत्सव आणि भव्य असा पुरस्कार वितरण सोहळा आहे.जगात पहिल्यांदाच अशा प्रकारचा चित्रपट महोत्सव आणि भव्य असा पुरस्कार वितरण सोहळा 'क्रुझ' वर आयोजित करण्यात येणार असून हे या कार्यक्रमाचे खास वैशिट्य असेल.'आयएमएफएफए' ची पहिली संध्याकाळ स्टार क्रुझवर ( व्हर्गो ) वर आयोजित करण्यात आली आहे. २० ते २४ सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये हा कार्यक्रम रंगणार आहे. हॉंगकॉंग येथून २० सप्टेंबरला या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून अनुक्रमे चीन आणि व्हिएतनामला ही बोट जाईल. २३ सप्टेंबरला रेड कार्पेटवर हा पुरस्कार सोहळा संपन्न होईल आणि २४ सप्टेंबरला क्रुझवर असलेल्या हेलिपॅडवर आयोजित केलेल्या दिमाखदार पार्टी नंतर या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल .

'स्टार क्रुझ' हा आमचा यातील एक महत्वाचा भागीदार आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत मराठी सिनेमांची जागृती निर्माण करून विविध घटकांना प्रोत्साहन देण्याचे आमचे उद्दिष्ठ असल्याचे ए. एम. एंटरटेन्मेंटचे आणि ब्रॉडकास्टिंगचे प्रा.लि. चे संचालक चिदंबर रेगे यांनी सांगितले.प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर हे आयोजक मंडळाचे सदस्य असून अमोल गुप्ते, रवि जाधव, महेश लिमये, संजय जाधव हे या सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत. हा एक दिमाखदार, नेत्रदीपक अविस्मरणीय सोहळा असेल याची आम्हाला खात्री असून आम्ही त्यासाठी उत्साही असल्याचे ए. एम. एंटरटेन्मेंटचे आणि ब्रॉडकास्टिंगचे प्रा.लि. चे संचालक निलेश कुलकर्णी यांनी सांगितले.

२७ ऑगस्टपर्यंत पुरस्कारांच्या विविध वर्गांची आणि त्यातील नामांकनांची घोषणा करण्यात येणार आहे. आयएमएफएफए २०१४ आगामी वर्षामध्ये ज्ञानाची देवाण घेवाण करणारे उत्तम माध्यम ठरेल अशी आशा ए. एम. एंटरटेन्मेंटचे आणि ब्रॉडकास्टिंगचे प्रा.लि. चे संचालक भास्कर अय्यर यांनी व्यक्त केली. अशा या रंगतदार सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी, बॉलीवूडमधील पाहुणे, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर मंडळीचे स्वागत केले जाणार आहे.