Sign In New user? Start here.

‘नादखुळा मंजुळा’ पहिला अल्बम

 
 
zagmag

‘नादखुळा मंजुळा’ पहिला अल्बम

मराठी संगीत रसिकांच्या अभिरुचीची दखल घेत दर्जेदार आणि उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने रोहिणी प्रफुल्ल यांनी ‘म्युझिक मिडीया सिनेव्हिजन’ या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आहे. या कंपनीतर्फे ‘नादखुळा मंजुळा’ हा धमाकेदार म्युझिकल अल्बम नुकताच तयार करण्यात आला आहे.

‘नादखुळा मंजुळा’ हे गीत के. प्रफुल्ल यांनी लिहिले असून या गीताला श्रवणीय संगीताची आणि आवाजाची साथ गायक शाम सागर यांनी दिली आहे. सारा श्रवण व अभिक बॅनर्जी या कलाकारांवर चित्रीत या गीताची कोरिओग्राफी विकी खान यांनी केली आहे. ‘नादखुळा मंजुळा’ हे गीत हरेश सावंत यांच्या कॅमेरातून चित्रीत झालं असून याचे व्हिडीओ डायरेक्टर अमोल भावे आहेत. उडत्या चालीचे ठेका धरायला लावणारं हे गीत तरुणाईला नक्कीच आवडेल अशी निर्मात्या रोहिणी प्रफुल्ल यांना खात्री आहे.

‘म्युझिक मिडीया सिनेव्हिजन’तर्फे भविष्यात लोकसंगीत, जागर, भक्तीसंगीत, लावणी, गझल यांसारख्या वैविध्यपूर्ण गीत-संगीताची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. ‘नादखुळा मंजुळा’ या अल्बमनंतर लवकरच नवरात्रीत ताल धरायला लावणारं नवकोरं गीत रसिकांच्या भेटीस आणणार आहेत. सध्या या म्युझिक कंपनीच्या वतीने ९ अल्बमसवर काम सुरु असून एकामागोमाग एक ते प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सोबतच ‘म्युझिक मिडीया सिनेव्हिजन’ मराठी चित्रपटाची निर्मिती करीत असून या वर्षाखेरीस त्याचे चित्रीकरण होणार आहे. या सिनेमासाठी हरिहरन यांच्या आवाजातील सुरेल गझल नुकतीच स्वरबद्ध करण्यात आली आहे.