Sign In New user? Start here.

"रिंगण" सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर "सैराटच्या" रिंकूला विषेश दखल राष्ट्रीय पुरस्कार घोषित

 
 
zagmag

"रिंगण" सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर "सैराटच्या" रिंकूला विषेश दखल राष्ट्रीय पुरस्कार घोषित

नवी दिल्लीत ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात येत आहे. रिंगण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्याच बरोबर अगामी सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरूला विशेष दखल पुरस्कार,सर्वोत्कृष्ट गायक - महेश काळे (कट्यार काळजात घुसली) घोषीत करण्यात आला. हिंदीमधील दम लगाके हैशा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलेय.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तेलुगू चित्रपट 'बाहुबली'ला घोषित झाला आहे. तर संजय लीला भंसाळी यांना 'बाजीराव मस्तानी'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार घोषित झालाय. सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार अमोल देशमुख यांना औषध या मराठी शॉर्टफिल्मसाठी, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट पायवाट या चित्रपटासाठी तर सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट दारवठा या मराठी चित्रपटास देण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या 'पिकू'तील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री कंगना राणावतला 'तन्नू वेड्स मन्नू २' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय.

राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेली यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट - बाहुबली द बिगिनिंग

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - संजय लीला भंसाळी (बाजीराव मस्तानी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिताभ बच्चन (पिकू)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत (तन्नू वेड्स मन्नू २)

चित्रपट प्रेमी राज्य - गुजरात

उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - पायवाट

बेस्ट शॉर्ट फिल्म - अमोल देशमुख - औषध

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगण

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हैशा

कोरिऑग्राफी - रिमो डिसुझा - बाजीराव मस्तानी

बेस्ट ज्युरी - कल्की

लिरीक्स - वरुण ग्रोव्हर - मोह मोह के धागे

सुजीत सावंत - प्रॉडक्शन डिझाईन - बाजीराव मस्तानी

संवाद - जुही चतुर्वेदी -पिकू, हिमांशू शर्मा - तन्नू वेड्स मन्नू २

सर्वोत्कृष्ट गायक - महेश काळे (कट्यार काळजात घुसली)

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बजरंगी भाईजान

विशेष पुरस्कार - बाहुबली

स्पेशल मेन्शन - रिंकू राजगुरू (सैराट)