Sign In New user? Start here.

 
 
zagmag

राहुल देव बर्मन यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त ‘प्लॅटिनम पंचम’ या दोन डिव्हीडीचे गीतकार गुलजार यांच्या हस्ते अनावरण

आपल्या अप्रतिम संगीताने केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे संगीतकार म्हणजे राहुल देव बर्मन (पंचम). भारतीय आणि बॉलीवूड संगीतासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. 27 जून 2014 या दिवशी राहुल देव बर्मन यांची 75 वी जयंती होती. राहुल देव बर्मन यांना श्रद्धांजली म्हणून ‘शेमारू एन्टरटेनमेन्ट’च्या वतीने ‘प्लॅटिनम पंचम’ या डीव्हीडींची निर्मिती करण्यात आली आहे.

पंचम यांच्या 75 व्या जयंतीचे औचित्य साधून यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या हस्ते ‘प्लॅटिनम पंचम’ या डीव्हीडी पॅकचे अनावरण नुकतेच टिळक स्मारक येथे करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट दिग्दर्शक राज सिप्पी, गायक भुपिंदर सिंह आणि मिताली सिंह, राहुल देव बर्मन यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले संगीतकार – अमृतराव काटकर, रणजित गझमेर (कांचा) आणि होमी मुल्लन आदी मान्यवर उपस्थित होते.

अनावरण सोहळ्यादरम्या ‘पंचम मॅजिक ग्रुप’ने राहुल देव बर्मन यांच्या संगीतावर आधारित एका विशेष कार्यक्रमही सादर केला. यावेळी पंचम यांच्याशी संबंधित किस्से सांगून ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आम्हाला कोणालाच असे वाटले नाही की आम्ही एका प्रतिभाशाली संगीतकारासोबत काम करत आहोत अशा आठवणी गुलजार यांनी यावेळी प्रेक्षकांना सांगितल्या.

प्लॅटिनम पंचम’ – राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या 75 वेगवेगळ्या मूडवरील गाण्यांचे हिंदी चित्रपटातील ओरिजिनल व्हिडीओसह कलेक्शन – यामध्ये “रात कली एक ख्वाब मे आई..” (बुढ्ढा मिल गया), “गुलाबी आँखे जो तेरी देखी..” (द ट्रेन), “जानेजाँ ढूँढता फिर रहा..” (जवानी दिवानी) अशा रोमँटिक गाण्यांपासून ते “मेरे नैना सावन भादो..” (मेहबूबा), “पिया तू अब तो आजा..” (कारवाँ), “हम दोनो दो प्रेमी (अजनबी)..” अशा वेगवेगळ्या मूडवरील गाणी आहेत. या डिव्हीडीमध्ये लोकप्रिय गाण्यांसोबतच ‘चरित्रहीन’, ‘गोमती के किनारे’, ‘उजाला ही उजाला’, ‘मदहोश’, ‘माती माँगे खून’ अशा चित्रपटातील गाजलेल्या अनवट चालींवरील गाण्यांचाही समावेश आहे.