Sign In New user? Start here.

 
 
zagmag

प्रभात चित्रपटगृहाला हेरिटेजचा दर्जा देण्यात यावा: विजय पाटकर

पुणॆ:मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीचा ऐंशी वर्षांपासून चा साक्षीदार असलेल्या प्रभात चित्रपटगृहाला सरकारने हेरिटेजचा दर्जा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी केली आहे.

प्रभात चित्रपटगृहाच्या जागेचा भाडेकरार डीसेबंर अखेर संपुष्टात येत आहे. त्यामुळे जागेचे मूळ मालक इंदूरचे सरदार किबे यांनी चित्रपटगृहाची जागा विकण्याच्या निर्णय घेतला. बाजीराव रोडवरील ही मोक्याची जागा मिळवण्यासाठी पुण्यातील काही बांधकाम व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. चित्रपटगृहाचे सध्याचे संचालक विवेक दामले यांनी हे चित्रपटगृह आपल्याला देण्याच्या दृष्टीने किबे यांच्याशी चर्चा सुरू आहे. पण ती चर्चा किती सफल होईल यावर मात्र प्रश्नचिन्ह आहेत. या वास्तू सोबत मराठी चित्रपटसृष्टीची अनेक ऎतिहासीक गोष्टी संबंधीत आहे म्हणून या पार्श्वभूमीवर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी प्रभात चित्रपटगृहाला हेरिटेजचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आही. काल प्रभात टॉकीज समोर निर्देशने करण्यात आली यामध्ये अनेक कलकारांनी सहभाग घेतला.

प्रभात चित्रपट्गृहाने गेल्या ८० वर्षांत १३ हजारावर चित्रपटांची मेजवानी दिली. ५१ चित्रपटांनी येथे सुवर्णमहोत्सव साजरा केला. ४६ चित्रपट १०० दिवस चालले. ११७ चित्रपटांनी ५० दिवस रसिकांना येथे आमंत्रण दिले. ‘तोहफा’ हा १९८५ मधील अखेरचा हिंदी चित्रपटही २६ आठवडे चालला. त्यानंतर मराठी चित्रपटांसाठी प्रभात हक्काचे माहेरघर आहे.