Sign In New user? Start here.

पुणे लावणी महोत्सवाची धमाकेदार सुरवात.

 
 
zagmag

पुणे लावणी महोत्सवाची धमाकेदार सुरवात.

पुणे - पुणे लावणी महोत्सवाला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आज धमाकेदार सुरवात झाली. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला आमदार सुनिल तटकरे , पुण्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे, अभिनेता सयाजी शिंदे आणि बीजेपी पक्ष नेते गणेश बिडकर उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी गुलाब बाई यांनी आपल्या खड्या आवाजात लावणी सादर केली आणि महोत्सवाची शानदार सुरुवात झाली.

वय वर्ष ८३ असूनही ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर, या वयात त्या बैठकीची आणि खडी लावणी करतात. महाराष्ट्र राज्य शासनाचा लोककलावंत पुरस्कार त्याच बरोबर पुणे मनपाचा पठ्ठे बापुराव पुरस्काराने त्यांना सन्मानीत केले गेले आहे. दिल्ली दुरदर्शन केंद्र , मुंबई दुरदर्शन केंद्र आणि पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये त्त्या प्रमुख लावणी गायिका म्हणून आजही कार्यरत आहेत. लता दिदींनी गायलेली ''राजसा जवळी जरा बसा…" ही पहिली लावणी त्यांनीच सादर केली आहे.

"लावणी महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्रातील लोककलाकारांनी या कलेला साता समुद्रापार पोहोचवले आहे. आपल्या वयाच्या उमेदीच्या काळात हे कलाकार आपली कला सादर करत असतात. पण उतरत्या वयात यांना उपेक्षा सहन करावी लागते. पण गुलाबबाई यांनी दाखवून दिले आहे की कलाकारचे वय कितीही झाले तरीही त्यांची कला कधीच जुनी होत नाही,'' असं मत उद्घाटन प्रसंगी आमदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केलं. प्राथमिक शिक्षण घेणा-ऱ्या विद्यार्थांनी लावणी पाहू नये असं म्हणातात. पण आमच्या लहानपणी चोरून लावणी पाहायचा मोह आवराता आला नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, ''माझ्या लहानपणी मी घरी पहिल्यांदा खोट सांगून विठाबाईची लावणी चोरून पाहिली. तेव्हा पासून लावणीची आवड निर्माण झाली आहे, ती आजपर्यंत तशीच आहे. आज बालगंधर्व रंगमंदीरात जिथे मोठ्या कलाकारांची नाटकं पाहिली, तिथे लावणी कलाकार आपली कला सादर करत आहेत याचा अभिमान वाटतो आहे. महाराष्ट्राच्या खेड्यातील जनतेने खऱ्या अर्थाने या लोककलेला, लावणीला जिवंत ठेवले आहे."

महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि साहित्याला जपण्यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान नेहमीच कटिबद्ध आहे, आणि त्याचाच भाग म्हणून लावणी लोककलावंताच्या कल्याणासाठी, पुणे लावणी महोत्सवाच्या माध्यमाने यावर्षी सहभागी सुमारे ४५० कलावंताना ५ लाखांचा अपघाती विमा तसेच २५ हजाराचा अपघाती उपचार खर्चसहाय्य विमा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान ने केला आहे, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली.